शिवसेना आक्रमक; भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात कार्यकर्त्यांचे चप्पल मारो आंदोलन
याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी आक्रमक भुमिका घेतली असून त्यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात डोबिवली (Dombivali) येथे चप्पल मारो आंदोलन सुरू केले आहे.
भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी आक्रमक भुमिका घेतली असून त्यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात डोबिवली (Dombivali) येथे चप्पल मारो आंदोलन सुरू केले आहे. नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक शिवसैनिक सहभागी झाले आहेत. नुकतीच सामना संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखात घेतली होती. या मुलाखातीनंतर आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली होती. त्यानंतर या वादाने पेटायला सुरुवात केली.
नागरिकत्व दुरूस्ती कायदा संपूर्ण देशात लागू झाला असून अनेक राज्यातून या कायद्याला विरोध दर्शवला जात आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला मुलाखात देत नागरिकत्व दुरूस्ती कायद्या संदर्भात विधान करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रात नागरिकत्व दुरूस्ती कायदा लागू होऊ देणार नाही, असे विधान उद्धव ठाकरे यांनी मुलाखातीत केले होते. यावरून आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. हा कायदा केंद्राचा आहे. कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही म्हणता, म्हणजे राज्य काय तुझ्या बापाचे आहे काय? अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती. आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर शिवसैनिकांनी नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी डोंबिवली येथील गोग्रासवाडी येथे आंदोलन केले. तसेच आशिष शेलार यांच्या फोटोला चप्पल मारण्यासह त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. हे देखील वाचा- आमच्या कामांना स्थगिती देणं इतकंच सरकारचं काम- रावसाहेब दानवे
उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केल्यानंतर आशिष शेलार म्हणाले होते की, मी व्यक्तिगत कुणाचा उल्सलेख केला नाही. माझ्या वक्तव्याने जर कुणाची भावना दुखावली गेली असेल तर, मी माफी मागतो. सामनामध्ये महाविकास आघाडीने वक्तव्य केले, यावरून राजकीय हेतूने घेतलेले निर्णय कसे पचवता येत नाही हे यातून दिसत आहे. आम्हाणा कोणाला हिंदुत्व शिकवायचे नाही, पण जनतेच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही विचारणार, असे आशिष शेलार म्हणाले होते.