Shivrajyabhishek Din 2022: शिवराज्याभिषेक सोहळा, किल्ले रायगडावर शिवप्रेमींची गर्दी; विशेष कार्यक्रमाचे आयोजन
आज सहा जून. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा राज्याभिषेक दिन. रायगडावर हा सोहळा ( Shivrajyabhishek Sohala) साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देश-विदेशातूनही अनेक लोक रायगडावर दाखल झाले आहेत.
किल्ले रायगड ( Fort Raigad) आज शिवप्रेमिंच्या गर्दीने फुलून गेला आहे. आज सहा जून. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा राज्याभिषेक दिन. रायगडावर हा सोहळा ( Shivrajyabhishek Sohala) साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देश-विदेशातूनही अनेक लोक रायगडावर दाखल झाले आहेत. रायगडावर दरवर्षीच हा सोहळ सहा जून रोजी मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. मात्र, पाठिमागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे शिवप्रेमींना रायगडावर जाता आले नव्हते. आता कोरोना निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी (Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Sohla 2022) शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर रायगडावर गर्दी केली आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती हेसुद्धा किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर जल्लोष, ढोल ताशांचा गजर अन् फटाक्यांची आतीषबाजी पाहायला मिळत आहे. राज्याभिषेक सोहळ्यासाठी दाखल होणाऱ्या शिवप्रेमींसाठी गडावर अन्नछत्र सुरु असून, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह , याचबरोबर निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवया वाहनाने दाखल होणाऱ्या शिवप्रेमींसाठी गडाच्या पायथ्याला वाहनतळ, मोफत शटल बससेवा, अन्नछत्र उभारण्यात आल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. (हेही वाचा,Shiv Rajyabhishek Din 2022 Wishes In Marathi: शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा Quotes, WhatsApp Status द्वारा देत शिवप्रेंमीचा दिवस करा खास! )
शिवराज्याभिषेक सोहळ्यारा रायगडावर होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीसांनीही मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यासाठी तीन भागांमध्ये नियोजन करण्यात आले आहे.
वाहतुकीचे नियोजन
कोंझर-1, कोंझर- 2 पार्किंग: सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, नातेखिंड मार्गे स्वत:ची वाहने घेऊन येणाऱ्या शिवप्रेमींसाठी
वाळुसरे-1: शटल सेवेने रायगडाकडे जाणाऱ्या शिवप्रेमींसाठी
शटल सेवा- कोंझर-3 ते पाचाड (एसटीने पाचाड पर्यंत पोहोचल्यानंतर शिवप्रेमींना पुढे पायी प्रवास करावा लागेल.
रोप वे सेवा: रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली रोप वे सेवा राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सुरु राहणार आहे.
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा राज्याभिषेक जरी 6 जून 1674 रोजी पार पडला असला तरी तो एका दिवसात पार पडला नाही. त्यासाठी आगोदरचे अनेक दिवस पूर्वतयारी सुरु होती. शिवराज्याभिषेकावेळी खरी अडचण अशी होती की, या आधी अशा प्रकारचा राज्याभिषेक झाला नव्हता. त्यामुळे तो कसा करावा याची काहीच पूर्वपरंपरा नव्हीत असे अभ्यासक सांगतात. त्यामुळे त्या वेळी छत्रपतींच्या दरबारात असलेल्या अनेक विद्वानांनी शास्त्र आणि परंपरांचा प्रदीर्घ अभ्यास केला. त्यासाठी विविध चालीरिती, परंपरा, धर्मशास्त्र, पुराण यांचाही अभ्यास करण्यात आला. त्या काळातील साम्राज्यातील विविध ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले. इतिहासात दाखला मिळतो की, राज्याभिषेकासाठी रायगडावर सुमारे लाखभर लोक जमले होते.यात विविध सरदार, प्रतिष्ठीत लोकांसोबतच, सामान्य नागरिकांचाही समावेश होता. याशिवाय देशी-विदेशी अभ्यासक, व्यापारी, विविध राजांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांचाही समावेश होता