MahaShivaratri 2021 निमित्त लक्ष्मी गौड यांनी जुहू चौपाटीवर साकारलं 12 शिवलिंगांचं वाळूशिल्प (See pics)
दरवर्षी महाशिवरात्री निमित्त देशभरातील विविध शिवमंदिरात मोठा उत्सव असतो. लहान-मोठी मंदिरं भाविकांनी फुलतात. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे अनेक शिव मंदिरात भाविकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
आज देशभरात महाशिवरात्र (MahaShivaratri) साजरी केली जात आहे. दरवर्षी महाशिवरात्री निमित्त देशभरातील विविध शिवमंदिरात मोठा उत्सव असतो. लहान-मोठी मंदिरं भाविकांनी फुलतात. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे अनेक शिव मंदिरात भाविकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तर यात्रा, मिरवणुकाही रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबईतील (Mumbai) जुहू चौपाटीवर (Juhu Beach) 12 शिवलिंगांचं सुरेख वाळुशिल्प (Sand Art) पाहायला मिळत आहे. लक्ष्मी गौड यांनी ही कलाकृती साकारली असून याचे फोटोजही सोशल मीडियावरुन समोर आले आहेत.
कोरोनाच्या सावटामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे 12 ज्योर्तिलिंग चौपाटीवर साकारण्यात आली आहेत. यासाठी लक्ष्मी यांना तब्बल 12 तास लागले. या फोटोत तुम्ही पाहू शकाल की, भगवान शिवशंकराचा प्रफुल्लित चेहरा वाळूतून साकारण्यात आला असून त्याच्या सभोवताली 11 शिवलिंग दिसत आहेत.
पहा फोटोज:
15 मार्च 2020 रोजी जुहू चौपाटीवर कोरोना व्हायरस विरुद्ध जनजागृती करणारं वाळुशिल्प साकारण्यात आलं होतं. यामध्ये हिरव्या रंगाचा मास्क घातलेल्या एका व्यक्तीचा चेहरा दाखवण्यात आला होता. ही कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, ओडिसाच्या पुरी बीचवर सुप्रसिद्ध वाळुशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी देखील महाशिवरात्री निमित्त सुंदर सँडआर्ड साकारलं आहे.