Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणूकसाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या 'बिस्कीट' या चिन्हाच्या निर्णयावर शिवसेनेचा आक्षेप

बिहार विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून, 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.

Shiv Sena | (Photo Credits-ANI)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election 2020) मतदानाला काही आठवडेच शिल्लक राहिले आहे. सगळ्या पक्षांमध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची लगबग असून, शिवसेनेनेही (Shiv Sena) बिहारच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार निवडणुकीत शिवसेना 50 जागांवर निवडणूक लढवणार आहे. असे असले तरी त्यांना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही. धनुष्यबाण हे सत्ताधारी पक्ष जनता दलाचे निवडणूक चिन्ह आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट (Biscuit) हे चिन्ह दिले आहे. मात्र, निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हाच्या निर्णयावर शिवसेनेने आक्षेप नोंदवणारे पत्र लिहले आहे.

धनुष्यबाण हे बिहारमधील सत्ताधारी नितीशकुमार यांच्या जनता दल पक्षाचे चिन्ह असल्यामुळे जेडीयूने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आक्षेप घेतला होता. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाची निशाणी धनुष्य बाण असल्याने मतदारांचा गोंधळ होतो असा जेडीयूचा आक्षेपचा मुद्दा होता. दरम्यान, बिहार निवडणकीसाठी शिवसेनेने निवडणूक आयोगाला ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट तीन पर्याय दिले होते. मात्र, निवडणूक आयोगाने कोणतेच चिन्ह न दिल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हाच्या निर्णयावर शिवसेनेने आक्षेप नोंदवणारे पत्रदेखील लिहले आहे. हे देखील वाचा- MPSC Exam 2020: एमपीएससी परिक्षांबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली नाराजी

कोरोनाच्या पार्श्वभूमी देशातील ही पहिली निवडणूक होणार आहे. बिहार विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून, 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.