शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांना सत्ता स्थापनेनंतर मिळू शकते या तीन मंत्रालयांची जबाबदारी

यातच शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे युवा नेता आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवला आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांना राज्यात कोणत्या मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Aaditya Thackeray (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2019) नुकतीच पार पडली असून युवा नेत्यांनी जनेतेला प्रभावित केले आहे. यातच शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे युवा नेता आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांना राज्यात कोणत्या मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच ही निवडणूक लढवली असून वरळी मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला आहे. महत्वाचे म्हणजे, सत्ता स्थापनेनंतर आदित्य ठाकरे यांना नगर विकास, शिक्षण आणि खेळ हे 3 मंत्रालय मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काही युवा चेहऱ्यांनी जनेतच्या मनात जागा निर्माण केली आहे. यात रोहित पवार, संदीप क्षीरसागर, ऋतुराज पाटील, आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे. परंतु, यांपैकी आदित्य ठाकरे यांची अधिकच चर्चा रंगत आहे. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार असा दावा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी करत आहे. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांना नगर विकास, शिक्षण आणि खेळ हे 3 मंत्रालयाची जबाबदारी सोपण्यात येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. हे देखील वाचा- Watch Video: देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा 'हा' व्हिडिओ वायरल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात अनेक नागरिक विकासाच्या गोष्टी मांडल्या आहेत. एवढेच नव्हेतर आदित्य ठाकरे यांना अनेकदा क्रिकेटच्या मैदानात पाहिले गेले आहे. यावरुन त्यांना हे मंत्रालय नक्की आवडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.