शरद पवार यांना 2022 मध्ये भारताचे राष्ट्रपती करण्यासाठी शिवसेनेची फिल्डिंग

शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना 2022 साली भारताच्या राष्ट्रपदी (Indian President) पदावर विराजमान करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जाणार आहेत अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.

Sharad Pawar (Photo Credits: Getty)

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक 2019 च्या निकालानंतर निर्माण झालेली सत्ताकोंडी फोडण्यामध्ये एनसीपीच्या शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसले आहेत. आता शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना 2022 साली भारताच्या राष्ट्रपदी (Indian President)  पदावर विराजमान करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जाणार आहेत अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.

मिशन 2022 अंतर्गत शरद पवार हे बिगर भाजपा दलाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार शरद पवार असावेत अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे. दरम्यान शरदा पवारांच्या मनधरणीसाठीदेखील ते प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी मीडीयाशी बोलताना दिलं आहे.

बिगरभाजपा दलाच्या वरिष्ठांच्या भेटी घेऊन शरद पवारांसाठी पाठबळ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची संजय राऊत लवकरच भेट घेणार आहेत. आज अशोक गेहलोत उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले आहेत. तसेच संजय राऊत यांनी आज मीडियाशी बोलताना पुरेसे संख्याबळ मिळवणार असल्याचा आशावाद बोलून दाखवला आहे.

दरम्यान महाराष्ट्रात सत्ताकोंडी असताना शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये भेट झाली तेव्हा भाजपाने शरद पवारांना राष्ट्रपती पदाची ऑफर दिली असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी हे वृत्त फेटाळले देखील होते.



संबंधित बातम्या