Shiv Sena on Nana Patole and Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांच्या बागडण्याचे महाराष्ट्राला जे कौतुक तेच नाना पटोले यांच्या बोलण्याचे- शिवसेना

हे भाष्य करत असताना नाना पटोले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनाही कोपरखळ्या मारण्यात आल्या आहेत.

Chandrakant Patil, Nana Patole | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वेळेवेळी केलेल्या विधानावरुन सुरु असलेल्या चर्चेवर शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना संपादकीयातून (Dainik Saamana Editorial) भाष्य करण्यात आले आहे. हे भाष्य करत असताना नाना पटोले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनाही कोपरखळ्या मारण्यात आल्या आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाना पटोले यांच्याविषयी केलेल्या विधानावरुनही टोलेबाजी करण्यात आली आहे. 'नाना हा विदर्भाच्या मातीतला रांगडा गडी आहे. मनास येईल ते दाणकन बोलतो. भाजपचे चंद्रकांत पाटील वगैरे पुढारीही मनास येईल ते बोलत असतात, पण पाटील हे निरागसतेचे लेणे आहे. ते एक निष्पाप बालक आहेत. त्यांच्या हसण्या-बागडण्याचे महाराष्ट्राला जितके कौतुक तितकेच कौतुक नानांच्या रांगड्या बोलीचे आहे,' अशा शब्दात शिवसेनेने टोलेबाजी केले आहे. तर, 'शरद पवारांसारखे मोठे नेते नानांना छोटा माणूस मानतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असा टोमणा मारतात. हीच नानांच्या कार्यकुशलतेची पोचपावती आहे', असेही शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेना संपादकीयात काय म्हटले?

नानांवर पाळत ठेवून सरकार पाडले जाईल या अंधभक्तीत कोणी राहू नये. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद तसे काँग्रेसकडे विधानसभेचे अध्यक्षपद होतेच. काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी नानांनीच त्या मोठय़ा पदाचा त्याग केला हे कसे विसरता येईल? त्यागमूर्तीला त्यामुळेच सत्य वचनाचे तेज प्राप्त होते व नानांना असे तेज प्राप्त झाले आहे. नानांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून काँग्रेसला जमिनीवरून हवेत आणले. काँग्रेस त्यामुळे घोंघावत आहे. नाना बोलतात व काँग्रेस घोंघावते किंवा डोलते.