Shiv Sena Symbol Row: शिवसेना पक्षाचं नाव, चिन्ह 'धनुष्यबाण' गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरूद्ध शिवसेना दिल्ली उच्च न्यायालयात; याचिका दाखल

काल निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्रिशूळ, मशाल आणि उगवता सूर्य अशा तीन चिन्हांचा पर्याय दिला आहे.

Shiv Sena Election Symbol |

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India) काल शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि पक्ष चिन्ह असलेले 'धनुष्यबाण' (Bow and Arrow) गोठवल्यानंतर आज या निर्णयाविरुद्ध शिवसेनेने दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेतली आहे. हा निर्णय निवडणूक आयोगाने घाईत घेतला असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. यावर पुन्हा विचार व्हावा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.  Uddhav Thackeray Speech: चाळीस डोक्याच्या रावणाने भगवान श्री रामाचे धनुष्य बाण तोडले, उद्धव ठाकरेंचे शिंदे गटावर टीकास्त्र .

केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. पण त्यांचं कार्यालय दिल्ली न्यायालयाच्या हद्दीमध्ये येत असल्याने शिवसेनेने आज याचिका दिल्ली उच्च न्यायालयात सादर केली आहे. आज (10 ऑक्टोबर) किंवा उद्या यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. 'आमची बाजू मांडण्याची संधी न देता प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवण्याचा निर्णय घेतला. यामुळे तातडीने सुनावणी घेऊन त्याला स्थगिती द्यावी' अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. शिवसेनेकडून दिल्लीत सध्या ही कायदेशीर प्रक्रिया खासदार अनिल देसाई पाहत आहेत. नक्की वाचा: Andheri East By Election: आज ठाकरे, शिंदे गटाच्या नाव, चिन्हांचा फैसला होण्याची शक्यता; निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष.

दरम्यान काल निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्रिशूळ, मशाल आणि उगवता सूर्य अशा तीन चिन्हांचा पर्याय दिला आहे. तर नावामध्ये ठाकरे कुटुंबातील तीन पिढ्यांच्या नावाचा उल्लेख असलेली नावं देण्यात आली आहेत.