Eknath Shinde चुकले, उपरती होताच Shrikant Pangarkar याची हकालपट्टी; Gauri Lankesh हत्या प्रकरणाची पुन्हा चर्चा
पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील सहभागावरून झालेल्या टीकेनंतर जालना विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून श्रीकांत पांगारकर याच्या नियुक्तीस शिवसेना पक्षाने स्थगिती दिली आहे.
महिला पत्रकार गौरी लंकेश (Gauri Lankesh) हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या श्रीकांत पांगारकर (Shrikant Pangarkar) यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश दिला. धक्कादायक म्हणजे त्याची निवडणूक प्रचारप्रमुख म्हणून नियुक्तीही करण्यात आली. मात्र, चौफेर टीका होताच शिंदे यांना आपली चूक उमगली आणि उपरती झाल्यानंततर त्यांनी या नियुक्तीस स्थगिती देत आपला निर्णय मागे घेतला आहे. शिवाय त्यांची पक्षातून हाकालपट्टी करत सदस्यत्वही रद्क करण्यात आले आहे. या पक्षप्रवेशामुळे या निर्णयाची देशभर चर्चा सुरु झाली होती. सन 2017 मध्ये लंकेश यांची हत्या झाली होती.
श्रीकांत पांगारकर याची हकालपट्टी
श्रीकांत पांगारकर याच्या प्रवेश आणि नियुक्तीवर सर्व स्तरांतून आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर 18 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या त्यांच्या नामांकनाबाबत संघटने फेरविचार करण्यात आला. दरम्यान, बीबीसी मराठीने शिवसेनेचे (शिंदे गट) सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पांगारकर याची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचं सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. मात्र, त्याच्या पक्षप्रवेशाबाबत जे काही झाले ते स्थानिक पातळीवर घडले आहे. त्याच्या पक्षप्रवेशाबाबचा निर्ण वरिष्ठ पातळीवर झाला नव्हता सचिवांनी म्हटले आहे. (हेही वाचा, श्रीकांत पांगारकर, Gauri Lankesh Murder Case मधील आरोपीने केला शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश; जालना विधानसभा प्रमुखपदीही नियुक्ती)
गौरी लंकेश हत्या प्रकरणातीलआरोपीस जामीन
गौरी लंकेश हत्या प्रकरणात ऑगस्ट 2018 मध्ये अटक करण्यात आलेल्या पंगारकरला कर्नाटक उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2024 मध्ये इतर तीन आरोपींसह जामीन मंजूर केला होता. आरोपपत्रानुसार, लंकेश यांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या गटाला मार्गदर्शन करण्यात, हत्येपूर्वी आणि नंतर घ्यावयाच्या सावधगिरीची माहिती देण्यात पंगारकर यांचा सहभाग होता. त्याने आरोपीला कायदेशीर प्रशिक्षणही दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. (हेही वाचा, गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपींचे कर्नाटकातील हिंदुत्ववादी गटांकडून जोरदार स्वागत)
प्रख्यात पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या 5 सप्टेंबर 2017 रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथील त्यांच्या घराबाहेर झाली. हिंदुत्वाचे निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 18 व्यक्तींच्या गटाला या गुन्ह्यात सामील करण्यात आले होते, ज्यात मुख्य आरोपी अमोल काळे याचाही समावेश होता.
श्रीकांत पांगारकर याची पार्श्वभूमी
पंगारकरांचा राजकीय प्रवास 1996 मध्ये शिवसेनापासून सुरू झाला. तथापि, 2011 मध्ये, पक्षाचे तिकीट नाकारल्यानंतर, ते हिंदू जनजाग्रती समिती या उजव्या विचारसरणीच्या संघटनेत सामील झाले. भाजप कार्यकर्ता आणि माजी नगरसेवकाचा मुलगा पंगारकर याची राजकारणात प्रदीर्घ कारकीर्द राहिली आहे, जी गौरी लंकेश यांच्या हत्येत त्याचा कथित सहभाग असल्याने आता धूसर झाली आहे. गौरी लंकेशच्या हत्येचा आरोपी परशुराम वाघमोरे आणि सहआरोपी मनोहर यादवे यांच्या जामिनावर सुटका झाल्यानंतर लगेचच त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. 11 ऑक्टोबर 2024 रोजी विजयपुरा येथे संघ परिवार आणि श्रीराम सेनेच्या सदस्यांनी या दोघांचा सत्कार केला, ज्यामुळे पांगारकर यांच्या शिवसेनेत पुन्हा प्रवेश करण्याबाबतचा राजकीय वाद आणखी तीव्र झाला आहे.