श्रीकांत पांगारकर, Gauri Lankesh Murder Case मधील आरोपीने केला शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश; जालना विधानसभा प्रमुखपदीही नियुक्ती

पांगारकर यांना शिवसेनेने 2011 मध्ये तिकीट दिले नव्हते त्यामुळे ते हिंदू जनजागृती समितीत सामील झाले होते. आता त्यांनी शुक्रवारी पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

श्रीकांत पांगारकर, Gauri Lankesh Murder Case मधील आरोपीने केला शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश; जालना विधानसभा प्रमुखपदीही नियुक्ती
Shrikant-Pangarkar

पत्रकार गौरी लंकेश (Gauri Lankesh) यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर (Shrikant Pangarkar)  ने आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या शिवसेनेमध्ये (Shiv Sena) पक्ष प्रवेश केला आहे. गौरी लंकेश यांची हत्या 5 सप्टेंबर 2017 मध्ये बेंगळूरू (Bengaluru) स्थित त्यांच्या घरी झाली होती. या प्रकरणामध्ये अनेकांना अटक झाली होती. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील यंत्रणांच्या मदतीने केलेल्या तपासात अनेकांना अटक केली होती. पांगारकर तेव्हा शिवसेनेत होते. 2001 ते 2006 दरम्यान ते जालना महापालिकेचे नगरसेवक होते. त्याला 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना या वर्षी 4 सप्टेंबर रोजी जामीन मंजूर केला होता.

पांगारकर यांना शिवसेनेने 2011 मध्ये तिकीट दिले नव्हते त्यामुळे ते हिंदू जनजागृती समितीत सामील झाले होते. आता त्यांनी शुक्रवारी पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. पांगारकर हे माजी शिवसैनिक असून ते पक्षात परतले आहेत. दरम्यान शिवसेना मध्ये पक्ष प्रवेशानंतर श्रीकांत पांगारकर याची जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.

महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणूका अगदी महिन्याभरावर येऊन ठेपल्या आहेत. 20 नोव्हेंबरला निवडणूका होणार आहेत तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2024 12:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).