Shiv Sena On Saamana: डोनाल्ड ट्रम्प यांची भलामण केली याचे दु:ख होतच असेल!; शिवसेनेचा पंतप्रधान मोदी यांना टोला
अमेरिकेच्या संसदेत जे घडले ते जगात कोणत्याही देशात घडू नये. पंतप्रधान मोदी यांनी आता ट्रम्प यांचा निषेध केला. मात्र याआधी ट्रम्पची भलामण केली याचेही दुःख त्यांना होतच असेल!,” असं म्हणत शिवसेनेनं टोला लगावला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हस्तांतरीत करताना मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊसमध्ये जो काही धुमाकूळ घातला त्याची जगभरात चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनीही घडल्या प्रकाराचा निषेध केला. याच मुद्द्यावरुन शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना (Saamana Editorial) संपादकीयातून पंतप्रधान मोदी यांनी टोला लगावण्यात आला आहे. 'अमेरिकेच्या संसदेत जे घडले ते जगात कोणत्याही देशात घडू नये. पंतप्रधान मोदी यांनी आता ट्रम्प यांचा निषेध केला. मात्र याआधी ट्रम्पची भलामण केली याचेही दुःख त्यांना होतच असेल!', असे शिवसेनेने म्हटले आहे.
सामना संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे
- अमेरिकेच्या संसदेत जे घडले ते जगात कोणत्याही देशात घडू नये. पंतप्रधान मोदी यांनी आता ट्रम्प यांचा निषेध केला. मात्र याआधी ट्रम्पची भलामण केली याचेही दुःख त्यांना होतच असेल!,” असं म्हणत शिवसेनेनं टोला लगावला आहे.
- “निवडणुकीचा निर्णय फिरविण्यात यावा यासाठी प्रे. ट्रम्प यांनी यंत्रणेवर दबाव आणला. भ्रष्टाचाराचे मोह निर्माण केले, पण यापैकी एकही यंत्रणा ट्रम्प यांना बधली नाही. ट्रम्प यांनीच नेमलेले हे सर्व लोक होते. पण त्या सगळ्यांनी अमेरिकेच्या संविधानाशीच आमची बांधीलकी असल्याचे स्पष्ट केले. हे सर्व प्रयोग कोसळले तेव्हा एखाद्या गुंडाप्रमाणे ट्रम्प यांनी लोकांना चिथावणी दिली. (हेही वाचा, 'सामना' च्या भाषेबाबत चंद्रकांत पाटील यांनी अखेर संपादिका रश्मी ठाकरे यांना लिहिले पत्र, काय लिहिलय त्या पत्रात?)
- ट्रम्प यांचे ‘झुंड’ सरळ अमेरिकेच्या संसदेत घुसले. त्यांनी संसदेवर हल्ला केला. अमेरिकेच्या संसदेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. हे धक्कादायक आहे. अमेरिकेच्या संसदेत जो हिंसाचार घडला त्याबद्दल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतीव दुःख व्यक्त केले आहे.
- आमच्या पंतप्रधानांची वेदना समजून घेतली पाहिजे; पण या भयंकर ट्रम्पच्या गळ्यात गळे घालून कालपर्यंत जगातले अनेक राज्यकर्ते फिरत होते. इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन हे तर प्रे. ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळायला हवा असे सांगत जगभर फिरत होते. ट्रम्प हा शांततेचा पुतळा आहे असे जॉन्सन साहेबांना का वाटावे?
- अमेरिकन संसदेतील गोळीबारात चार लोक मेले आहेत. अमेरिकेवर ‘9/11’चा हल्ला झाला. तो अतिरेकी व दहशतवाद्यांनी घडवला. त्या हल्ल्यातून अमेरिका उभी राहिली. त्या हल्लेखोर ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून मारले व पाताळात गाडले. पण प्रे. ट्रम्प यांनीच लादेनचा वारसा चालवत अमेरिकेच्या संसदेवर हल्ला घडवून आणला आहे.
दरम्यान, ट्रम्प यांचे वर्तन व बोलणे हे सुसंस्कृत माणसासारखे कधीच नव्हते. त्यांचा सार्वजनिक वावर हा शिसारी आणणाराच होता. अशा माणसासाठी मोदी सरकारने अहमदाबादेत लाल गालिचे अंथरले होते. हा समस्त गुजराती बांधवांचा, गांधी, सरदार पटेलांचाच अपमान आहे. बरे झाले, या दळभद्री ट्रम्पचे पाय आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रास लागले नाहीत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पंतप्रधान मोदी यांनी गुजरातेत नेऊन मिरवले. त्या चिनी राष्ट्राध्यक्षाने आता लडाखमध्ये त्यांचे सैन्य घुसवले. ट्रम्प यांना अहमदाबादेत नेले, त्यांनी येताना कोरोना आणला व आता लोकशाहीची सरळ हत्याच केली. आमचे परराष्ट्र धोरण हे प्रवाहपतित होत आहे, असाही निशाणा शिवसेना संपादकीयातून साधण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2021 11:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

