स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा 'संघ' परिवार कोठे होता? सावरकर मुद्द्यावरुन शिवसेनेचा रोखठोक सवाल

भाजपतर्फे विधानसभेत सावरकर गौरवाचा प्रस्ताव आणणे व त्यावर चर्चा करणे ही 'कोंडी' करण्याची योजना कशी होऊ शकते? वीर सावकर हा फक्त चर्चेचा विषय नाही, तर कृतीचा आणि जगण्याचा विषय आहे.' असे सांगतानाच, ''सावरकरांच्या स्मरणाचे ढोंग आज जे करीत आहे त्यांना सावरकर खरेच कळले काय? असा सवालही विचारला आहे.

Shiv Sena, Veer Savarkar, BJP | (Photo credit: archived, edited, symbolic images)

वीर सावरकर ( Veer Savarkar) यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप (BJP) किंवा तेव्हाचा 'संघ' (RSS) परिवार कोठे होता? 1947 साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही. काही ठिकाणी तिरंग्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदवले गेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांची 'ढाल' करुन भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर 'पेच' निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर पेच निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकटात मात्र नक्कीच लाथ बसेल, अशा शब्दात शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामना संपादकीयातून भाजपवर शरसंधान साधण्यात आले आहे.

'वीर सावरकरांची ढाल! भाजपला पुळका खोटा' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात दै. सामना संपादकीयात भाजपवर अत्यंत तीव्र शब्दांमध्ये हल्ला चढवण्यात आला आहे. या लेखात म्हटले आहे की, 'वीर सावरकरांच्या विषयावर सरकारची कोंडी करु, असे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील मंडळींनी जाहीर केले. याचा अर्थ स्पष्ट आहे. सावरकर हा भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय राहिला नसून फक्त राजकारणाचा विषय बनला आहे. भाजपतर्फे विधानसभेत सावरकर गौरवाचा प्रस्ताव आणणे व त्यावर चर्चा करणे ही 'कोंडी' करण्याची योजना कशी होऊ शकते? वीर सावकर हा फक्त चर्चेचा विषय नाही, तर कृतीचा आणि जगण्याचा विषय आहे.' असे सांगतानाच, ''सावरकरांच्या स्मरणाचे ढोंग आज जे करीत आहे त्यांना सावरकर खरेच कळले काय? असा सवालही विचारला आहे.

भाजपने शिवसेनेला प्रश्न विचारण्यापूर्वी केंद्रातील भाजपने सावरकरांचा सन्मान राखला काय? यावर महाराष्ट्रातील फडणवीस, पाटील, मुनगंटीवार, शेलार आदी मंडळींनी प्रश्न उभे केले पाहिजेत. कालच्या प्रजासत्ताक दिनीही मोदी सरकारने वीर सावकरकर यांना 'भआरतरत्न' का जाहीर केले नाही? यावर नवसावरकर प्रकाश टाकणार आहेत काय? असाही सवाल 'सामना' संपादकीयात विचारण्यात आला आहे. (हेही वाचा, स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव प्रस्तावावरुन राज्य विधिमंडळात वातावरण तापले; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठं विधान; 5 मुद्दे)

दरम्यानस स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा 'संघ' परिवार कोठे होता? असा सवाल विचारत '1947' साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही. काही ठिकाणी तिरंग्याचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार पटेल यांनी दोन वेळा बंदी आणली. दोन्ही वेळेला 'बंदी' उठवताना सरदारांनी एक अट कायम ठेवली ती मह्णजे 'तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज आहे. तो मानावाच लागेल" ही अट गोळवलकर गुरुंजींनी मान्य केली. पण 2002 पर्यंत संघाने हा शब्द पाळला नाही, असे 'रेकॉर्ड' सांगतेय. राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे देशद्रोही ठरवले जातात. स्वत:स राष्ट्रवादी म्हणूवून घेणाऱ्या संघटना 2002 पर्यंत 'राष्ट्रध्वज' फडकावयला तयार नव्हत्या. भगवा ध्वज हे शिवसेनेचेही प्रतीक आहे. पण, भगव्याच्या बरोबरीने तिरंगाही फडकावला जातो, असे स्मरण दै. सामनातून भाजपला करुन देण्यात आले आहे.