विरार मध्ये गटारीनिमित्त अल्प दरात मिळणार चिकन; पहा काय आहे शिवसेनेची ऑफर

चिकनची अल्प दरात विक्री करण्यात येणार आहे. गटारीनिमित्त वाढणारी चिकनची मागणी आणि येऊ घातलेल्या निवडणूका लक्षात घेता शिवसेनेने ही ऑफर सादर केली आहे.

Chicken (Photo Credits: Pixabay)

गटारी अमावस्येनिमित्त (Gatari Amavasya) वसई विरार महापालिकेतर्फे (Vasai Virar Municipal Corporation) खास ऑफर देण्यात आली आहे. चिकनची अल्प दरात विक्री करण्यात येणार आहे. गटारीनिमित्त वाढणारी चिकनची मागणी आणि येऊ घातलेल्या निवडणूका लक्षात घेता शिवसेनेने (ShivSena) ही ऑफर सादर केली आहे. विरार (Virar) पूर्व भागातील साईनाथ नगर अल्प दरात चिकनची विक्री होणार आहे. सध्या चिकन 230 ते 240 रुपये प्रति किलोने मिळत आहे. परंतु, शिवसेनेच्या या ऑफर अंतर्गत चिकन 180 रुपये किलोने मिळणार आहे.

रविवारी 8 ऑगस्टला विरार पूर्व साईनाथ नगर नाका येथे सकाळी 9 ते 11 या वेळेत ही ऑफर उपलब्ध होणार आहे. मात्र त्यासाठी आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसंच प्रत्येकाला एकच किलो चिकन मिळणार आहे. नोंदणीसाठी संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत- 8149356909, 8999808542, 7798754240.

या ऑफरच्या जाहीरातीसाठी फलक लावण्यात आले आहे. यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे फोटो आहेत. हिला आघाडीच्या सौ रुचिता चेतन रुके यांनी या ऑफरचे आयोजन केले आहे. (आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज डोंबिवली मध्ये 1 रुपयांत पेट्रोल; नागरिकांची तुफान गर्दी, Watch Video)

दरम्यान, यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली येथे 1 रुपये प्रति लीटरने पेट्रोल देऊन शिवसेने नागरिकांना खुश केले होते. आता पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने अल्प दरात चिकन देऊन नागरिकांना आकर्षित केले आहे.