Shiv Sena MP Sanjay Raut On Kangna Ranaut: कंगना रनौत ला पाठिंबा देऊन मुंबई आणि मुंबई पोलिस दलाची प्रतिमा करण्याचा राजकीय प्रयत्न; संजय राऊत यांची प्रतिक्रिया
तिचं असं वक्तव्य म्हणजे तिला कोणत्यातरी राजकीय पक्षाचा, केंद्रातील सत्तेकडून पाठिंबा मिळाल्याने केल्याचा दावा संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangna Ranaut) मुंबई पोलिसांची (Mumbai Police) भीती वाटते, हे शहर मला पाकव्याप्त कश्मीर (POK) प्रमाणे का वाटते? असं बेजबाबदार ट्वीट केल्यानंतर सोशल मीडियांत अनेकांनी तिच्या वक्तव्याचा धिक्कार केला. आज त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी कंगना महाराष्ट्राचा अपमान करत आहे. तिचं असं वक्तव्य म्हणजे तिला कोणत्यातरी राजकीय पक्षाचा, केंद्रातील सत्तेकडून पाठिंबा मिळाल्याने केल्याचा दावा त्यांनी केला आहे.सोबतच यामध्ये राजकीय षडयंत्र असल्याचा दावा देखील संजय राऊतांनी केला आहे. यामुळे मुंबई आणि मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन केली जात आहे. मुंबई बद्दल कंगना रनौत हिने केलेल्या विधानाशी सहमत नाही; भाजपच्या वतीने आशिष शेलार यांची स्पष्टोक्ती.
कंगनाला धमकवण्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले आम्ही पोकळ धमक्या देत नसतो. कृती करणारी आम्ही माणसं आहोत. कंगना धमकवण्याचा प्रश्नच नाही. ती एक महिला कलाकार आहे. आम्ही तिचा आदर करतो. एका महिलेबद्दल उलट सुलट बोलणं अपराध आहे. पण महिलेने उलट सुलट बोलणं चालतं का? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
दरम्यान पाकव्याप्त कश्मीरची स्थिती पहा आणि नंतर त्याची तुलना मुंबईसोबत करा. तसेच कंगनाला पाठिशी घालणार्या सत्ताधार्यांनी आधी विचार करावा त्यांना मतं कोणी दिली? अडीअडचणींना मुंबई पोलिस उभा असतो. दहशतवादी हल्ल्यांपासून कायदा आणि सुव्यवस्थेच्या वेळेस मुंबई पोलिसांनी धारिष्ट्य दाखवलं आहे. मग अशावेळेस त्यांच्याबद्दल असं बोलणं शोभत नाही. हा त्यांचा मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न आहे असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.