Gajanan Kirtikar On Rohit Pawar: शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांचे आमदार रोहित पवार यांच्यावर थेट टीकास्त्र, म्हणाले 'हे धंदे बंद करा'
दुसऱ्या बाजूला मात्र महाविकासआघाडीमधील नेत्यांमध्ये कुरुबुरीच्या घटना नेहमीच पुढे येताना दिसतात. अनेक नेते कधी छुपे तर कधी थेटपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
महाविकासाघाडी एका बाजूला अधिक भक्कमपणे उभी आहे. दुसऱ्या बाजूला मात्र महाविकासआघाडीमधील नेत्यांमध्ये कुरुबुरीच्या घटना नेहमीच पुढे येताना दिसतात. अनेक नेते कधी छुपे तर कधी थेटपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. रोहित पवार हे भाजपचे तत्कालीन मंत्री राम शिंदे यांना पराभूत करुन अहमदनगर येथून विधानसभेवर विजयी झाले आहेत. याच रोहित पवार यांच्यावर कीर्तिकर यांनी (Gajanan Kirtikar On Rohit Pawar) जोरदार निशाणा साधला आहे.
आमदार रोहित पवार यांचे आजोबा शहरत पवार यांनी महाविकाआघाडी करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. पवार कुटुंबाला राजकारण, समाजकारणात मोठी परंपरा आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी त्याची गांभीर्याने जाण ठेवण्याची गरज आहे. रोहित पवार हे शिवसेना कार्यकर्त्यांवर दबाव टाकत असतात. त्यांनी हे धंदे बंद करावेत, अशा शब्दात गजानन किर्तिकर यांनी रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांच्या टीकेला रोहित पवार काय उत्तरे देतात याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Rohit Pawar on Raj Thackeray: 'मनसेने राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी', राज ठाकरे यांच्यावर रोहित पवार यांचा थेट निशाणा; फेसबुक पोस्ट चर्चेत)
गजनन किर्तीकर हे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून अहमदनगर येथे बोलत होते. या वेळी ते अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून बोलत होते. कीर्तिकर यांनी म्हटले की, आमदार रोहित पवार यांनी आघाडीधर्म पाळण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी त्यांनी स्वपक्षासोबतच महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनाही सोबत घेऊ काम करणे अपेक्षीत आहे. शिवसैनिकांनी ज्या तक्रारी केल्या आहेत या तक्रारी गंभीर स्वरुपाच्या आहेत. त्यामुळे यापुढे त्यांनी काळजी घ्यावी नाहितर शिवसैनिक हा आघाडी धर्म पाळण्यास बांधिल नाही, असा इशाराही गजानन किर्तिकर यांनी या वेळी दिला.