ED Attaches Assets of Pratap Sarnaik: ईडीने 11.35 कोटींची संपत्ती जप्त केल्यावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आक्रमक, काय म्हणाले पाहा?
स्वत: प्रताप सरनाईक यांनीही याबाबत माहिती दिली.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांची 11.35 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त (ED Attaches Assets of Pratap Sarnaik) केली आहे. स्वत: प्रताप सरनाईक यांनीही याबाबत माहिती दिली. अभिनेत्री कंगना रनौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल केल्यामुळेच माझ्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली, अशी प्रतिक्रिया या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मी राजकारणी आहे. परंतू, आगोदर मी व्यवसायात होतो नंतर मी राजकारणात आलो. त्यामुळे व्यवसायीक आणि राजकीय नेता अशा दोन्ही भूमिकेत आहे असेही सरनाईक म्हणाले.
भारतीय नागरिक म्हणून जे काही अधिकार आहेत ते अधिकार वापरत मी न्यायालयाकडे दाद मागेल. ईडीने ठाणे येथील माझे राहते घर आणि इतर ठिकाणची काही जमीन जप्त केली आहे. या विरोधात मी न्यायालयाकडे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये दाद मागणार आहे. प्रसारमाध्यमांतून कोट्यवधींचे आकडे देत NSEL घोटाळा वैगेरे म्हणत वृत्त दिले आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांतून लोकांमध्ये चुकीची प्रतिमा जाऊ नये यासाठी मी स्वत: प्रसारमाध्यमांसमोर बोलत आहे, असेही प्रताप सरनाईक म्हणाले. (हेही वाचा, Pratap Sarnaik Vs Kirit Somaiya: आमदार प्रताप सरनाईकांचा किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा)
दरम्यान, NSEL घोटाळा प्रकरणात ईडीने प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. ईडीने सरनाईक यांचे ठाणे येथील दोन फ्लॅट जप्त केल्याची माहिती आहे. मनी लॉन्ड्रींग प्रतिबंद कायद्यानुसार सरनाईक यांच्यावर कारवाई करण्यत आली आहे. प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच महाविकासाघाडीच्या इतरही नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांची कारवाई सुरुआहे. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार ही लढाई अधिक तीव्र होईल, अशी चिन्हे आहेत.