Uddhav Thackeray On Rahul Narwekar: विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची मिलीभगत! त्यांना लोकशाहीची हत्या करायची आहे? उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रिम कोर्टात प्रतित्रापत्र

तत्पूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीवर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credit - X)

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Shiv Sena MLA Disqualification Case)निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे. तत्पूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीवर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. या भेटीवरुन ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयातही एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादा आणि निर्देशानुसार उद्या (10 जानेवारी) जाहीर होणे अपेक्षीत आहे.

विधानसभा अध्यक्षांची काही मिलीभगत?

उद्धव ठाकरे यांनी थेट प्रश्न विचारत म्हटले आहे की, मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची काही मिलीभगत आहे काय? दोघे मिळून लोकशाहीची हत्या करणार आहेत काय? असा सवाल निर्माण होतो आहे. कारण, न्यायाधीशच आरोपीच्या भेटीला जात असेल तर ही शंका निर्माण होणे रास्त आहे. मुसुद्धा काही काळ मुख्यमंत्री होतो. माझ्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष केव्हाही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात नाहीत. जर त्यांना भेटायचे असेल तर ते मुख्यमंत्र्यांना भेटायला बोलावत असतात. त्यामुळे अशी काय तातडी होती की, निकालाच्या काहीच काळ आगोदर ही भेट झाली?, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. (हेही वाचा, Shiv Sena MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालपत्र तयार, काऊंटडाऊन सुरु; नार्वेकरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष)

देशात लोकशाही राहणार की नाही?

आमदार अपात्रता प्रकरणाचा खटला केवळ माझ्यासाठी नव्हे तर देशाच्या लोकशाहीसाठी महत्त्वाचा असणार आहे. देशात लोकशाही राहणार आहे किंवा नाही याबातब हा खटला भाष्य करणार आहे. पाठिमागील दोन वर्षांपासून या खटल्यावर चर्चा, सुनावणी आणि उलटतपासणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबर ही वेळ दिली होती. त्यानुसार सुनावणी सुरु असतानाच आमच्या लक्षात आले की, वेळकाढूपणा सुरु आहे. आता 10 तारखेला तरी निकाल देतील, असे अपेक्षीत आहे. अन्यथा, मला माहित नाही पण वरुन जसे आले आहे तसे दहा जानेवारीच्या रात्री 11:59 पर्यंत वेळ खेचतील आणि मग निकालाचे वाचन सुरु करतील असेही वाटते. (हेही वाचा, Rahul Narwekar On MLAs Disqualification Case: असंवैधानिक निर्णय झाला तरच सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करेल; राहुल नार्वेकर यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य)

व्हिडिओ

'न्यायाधीशच आरोपीच्या भेटीला'

विधानसभा अध्यक्ष जर लवाद म्हणून काम करत असतील तर ते न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत. इथे जर न्यायाधीशच आरोपीच्या भेटीला जात असतील तर काय अपेक्षा ठेवायची. विधानसभा अध्यक्ष हे आमदारही असतात. जर त्यांच्या मतदारसंघातील कामे असतील आणि त्यासाठी भेटले असतील तर ती भेट नियोजित असते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये ती निश्चित करावी लागते. तसेच, या भेटीवेळी प्रशासकीय अधिकारी आणि इतर लोकही असतात. यापैकी कोणतेच लोक नसताना ही भेट नेमकी कोणत्या कारणास्तव झाली? याबातब स्पष्टता येणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.