Shiv Sena MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानभवनात सुनावणी, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे गटाचे MLA दाखल

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी पार पडते आहे. दुपारी 12 वाजलेपासून ही सुनावणी सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde | (Photo credit: archived, edited, representative image)

Rahul Narwekar Shiv Sena MLA Disqualification Case: शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रता याचिकेवर आज (14 सप्टेंबर) सुनावणी पार पडते आहे. राज्याच्या विधानभवन परिसरात पार पडत असलेल्या या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Faction) गटाचे 14 तर एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde Faction) 40 आमदार उपस्थित आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी पार पडते आहे. दुपारी 12 वाजलेपासून ही सुनावणी सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन्ही गटाचे आमदार विधिमंडळात दाखल झाल्यानंतर आवश्यक ती नियमावलीही स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा सुनावणीत नेमके काय घडते. त्यासोबतच निर्णय काय येतो याकडे लागल्या आहेत.

राज्याच्या इतिहासातील बहुदा हे पहिलेच प्रकरण असावे ज्याची अशा पद्धतीने सुनावणी पार पडते आहे. विधानसभा अध्यक्ष परस्परांविरोधात दाखल झालेल्या तब्बल 34 याचिकांवर सुनावणी करणार आहेत. सुनावणीदरम्यान वादी आणि प्रतिवादी आमदारांना आपापले म्हणने मांडता येणार आहे. इतकेच नव्हे तर या आमदारांना आपले म्हणने मांडण्यासाठी वकिलाची मदत घेण्याचीही मुभा असणार आहे. दोन्ही बाजूंच्या आमदारांना आपापली बाजू मांडताना पुरावे सादर करुन म्हणने मांडता येणार आहे. प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी होणार आहे. याचिकेनुसार आमदारांना बोलावण्यात येणार असल्याचे समजते.

विधनभवनाच्या सेंट्रल हॉल येथे आमदार अपात्रता प्रकरणावर ही सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर पार पडते आहे. या वेळी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. सुनावणी सुरु असताना कोणत्याही याचिकाकर्त्याला अथवा त्यासोबत असलेल्या वकील अथवा तत्सम व्यक्तीस मोबाईल सोबत नेता येणार नाही. सुनावणी सुरु असतानाचे कोणताही प्रसंग, दृश्य यांचे व्हिडिओ चित्रीकरण करता येणार नाही. सर्वांची बैठक व्यवस्था सेंट्रल हॉलमध्ये मागील बाकांवर करण्यात आली आहे. याचिकेच्या क्रमानुसार याचिकाकर्त्याला वकीलासोबत आपापले म्हणने मांडता येणार आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे सर्व आमदार सुनावणीसाठी उपस्थत आहेत. ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली आहे की, सुनावणी पूर्ण करुन आजच निर्णयही द्यावा. मात्र, विधानसभा अध्यक्ष खरोखरच असे करतात की निर्णय राखून ठेवतात की, सुनावणीच लांबते याबाबत उत्सुकता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif