Coronavirus: शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अरविंद सावंत, वरुण सरदेसाई कोरोना व्हायरस संक्रमित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारमधील सर्वाजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde) आणि शिवसेना (Shiv Sena) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि युवा सेना प्रमुख वरुण सरदेसाई Varun Sardesai) यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारमधील सर्वाजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde) आणि शिवसेना (Shiv Sena) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि युवा सेना प्रमुख वरुण सरदेसाई Varun Sardesai) यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. महाविकासागाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. यासोबतच इतरही विविविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढणार का अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन माहिती दिली. शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी.'' (हेही वाचा, Corona Virus Update: सुकमा जिल्ह्यात पोलीस कॅम्पमध्ये कोरोनाचा विस्फोट, एकाच वेळी 38 जवानांचा अँटीजेन रिपोर्ट पॉझिटिव्ह)
ट्विट
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही त्यांना झालेल्या कोरोना व्हायरस संसर्गाची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!'
ट्विट
आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमित झालेल्या राजकीय नेत्यांमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांचीही कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.