IPL Auction 2025 Live

शिवसेना नेत्या Priyanka Chaturvedi यांनी घेतली जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांची भेट

त्यांनी रजनी बाला यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि कुटुंबीयांचीही भेट घेतली

प्रियंका चतुर्वेदी (फोटो सौजन्य-IANS)

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगचा बळी ठरलेल्या राहुल भट्ट आणि महिला शिक्षिका रजनी बाला यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. राहुल भट्ट यांना काश्मिरी पंडितांसाठी विशेष रोजगार पॅकेज अंतर्गत लिपिकाची नोकरी मिळाली होती. 12 मे रोजी बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथील तहसीलदार कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

त्यांनी रजनी बाला यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि कुटुंबीयांचीही भेट घेतली. त्यांनी रजनी बाला यांचे पती राज कुमार, मुलगी सना अत्री, वडील राम लाल आणि इतर सदस्यांचीही भेट घेतली. या दु:खद घडीमध्ये शिवसेना कुटुंबाच्या पाठीशी उभी असल्याचे त्यांनी सांगितले.

चतुर्वेदी यांनी सांगितले की, काश्मिरी पंडितांचा मुद्दा शिवसेना उपस्थित करणार असून, खोऱ्यात काम करणाऱ्या समाजाच्या सुरक्षेची मागणीदेखील त्यांनी केली आहे. त्यांच्यासोबत शिवसेना जम्मू-काश्मीर प्रमुख मनीष साहनी यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते होते.