पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेना नेत्या भारती कामडी यांची निवड
तसेच उपाध्यक्षपदी अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुक निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली होती.
पालघर जिल्हा परिषदेच्या (Palghar Zilla Parishad)अध्यक्षपदी शिवसेना नेत्या भारती कामडी (Shiv Sena Leader Bharati Kamadi) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे (Nilesh Sambre) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुक निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली होती.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मागे टाकण्यात शिवसेना-राष्ट्रवादीला यश आलं आहे. या निवडणुकीसाठी भाजप पक्षातर्फे सुरेखा थेतले व उपाध्यक्ष पदासाठी जयवंत डोंगरकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. तसचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व बहुजन विकास आघाडीच्यावतीने अध्यक्षपदासाठी मनिषा बुधर आणि उपाध्यक्षपदासाठी विष्णू कडव यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. (हेही वाचा - परळी: धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून व्यापाराला मारहाण; राष्ट्रवादी कार्यकर्ते गणेश कराड यांच्यासह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल)
पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 18, राष्ट्रवादी काँग्रेस 14, भाजपाचे 12, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 5, बहुजन विकास आघाडीचे 4, काँग्रेसचा 1 आणि 3 अपक्ष सदस्य निवडून आले होते. यातील अपक्ष उमेदवाराने शिवसेना-राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सदस्यांची संख्या 33 झाली. या निवडणुकीत इतर उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे शिवसेना नेत्या भारती कामडी आणि अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती.