Anil Parab Criticizes on BJP: 'त्यांना पाच वर्ष दुसरे काम नाही' शिवसेना नेते अनिल परब यांचा विरोधकांना टोला
दरम्यान, राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. या काळात जनतेला कोणताही दिलासा मिळालेला नाही. तसेच राज्यातील जनतेला भाजपचे सरकार हवे आहे, अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटले आहे. दरम्यान, राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. या काळात जनतेला कोणताही दिलासा मिळालेला नाही. तसेच राज्यातील जनतेला भाजपचे सरकार हवे आहे, अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. विरोधकांच्या या टिकेला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्य सरकारने वर्षभर काम केले आहे, म्हणून विरोधक निराश आहेत. यामुळे विरोधकांना विरोध करण्याशिवाय पाच वर्ष दुसरे काम नाही, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.
दरम्यान, अनिल परब यांनी शेतकरी कर्जमाफी, मेट्रो कारशेड, मराठा आरक्षणावर भाष्ये केले आहे. परब म्हणाले की, “शेतकऱ्यांना सरकारने सुरुवातीलाच कर्ज माफी दिली आहे. तसेच कारशेडसाठी जमिनीबाबत आम्ही अभ्यास करुनच कांजूरमार्गला नेण्याचा संकल्प केला. याशिवाय, मराठा आरक्षण टिकावे, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू केले जात आहेत. मात्र, हा विषय कोर्टात आहे. त्यामुळे कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यावेळी त्यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्याही टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणेंकडून प्रमाणपत्र घेण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत, असेही अनिल परब म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Udayanraje Bhosale on Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो; उदयनराजे भोसले यांची राज्य सरकारवर टीका
उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्याबद्दल परब म्हणाले की, उर्मिला मातोंडकर यांचा मंगळवारी शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यांचे नाव विधान परिषदेसाठी पाठवलेले आहे. राज्यापालांना पाठवलेली सर्व नावे ही कॅबिनेटची मान्यता घेऊन पाठवलेली आहेत. आम्ही निर्णयाची वाट पाहत आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.