Corona Vaccination: शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोफत कोरोना लसीकरणाबाबतचे ट्विट केले डिलीट
याचपार्श्वभूमीवर बिहार, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोफत लसीकरणाची (COVID-19 Vaccine) घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्रसह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. याचपार्श्वभूमीवर बिहार, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोफत लसीकरणाची (COVID-19 Vaccine) घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार कधी मोफत लसीकरणाची घोषणा करणार? असा प्रश्न विचारला जात असताना आदित्य ठाकरे (Aaditya Thakeray) यांनी ट्विटरच्या माध्यातून राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणाच करून टाकली होती. परंतु, काही वेळाने त्यांनी हे ट्वीट डिलीट करून टाकले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना राज्यातील नागरिकांना कोरोनाची लस कधी मिळणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यातच आदित्य ठाकरे यांनी मोफत लसीकरणाबाबतचे एक ट्विट केले होते. परंतु, त्यांनी काही काळानंतर हे ट्वीट डिलीट केले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'राज्य सरकारकडून मोफत लसीकरण करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अधिकृत लसीकरण धोरणाबाबत गोंधळ होऊ नये म्हणून मी पूर्वीचे ट्विट हटवले आहे, असे ते म्हणाले आहेत. तसेच लसीकरणाबाबत अधिकृत धोरण समितीद्वारे घोषाण केली जाणार आहे. झालेल्या गोंधळासाठी मी दिलगीर व्यक्त करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- COVID-19 Vaccine: मुंबईत वस्तीपातळीवर जाऊन लस देण्याचा विचार सुरु- किशोरी पेडणेकर
आदित्य ठाकरे यांचे ट्वीट-
महाराष्ट्रात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. दरम्यान, महाराष्ट्रसह संपूर्ण देशात येत्या 1 पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होता. तसेच तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. केंद्र सरकार 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना कोरोना लस पुरवणार नाही. ही लस त्यांना स्वतःच खरेदी करावी लागेल किंवा मग राज्यांना ही लस विकत घ्यावी लागणार आहे.