Kirit Somaiya Pushback Case: 'दोन, तीन महिने उठला नाही पाहिजे असा मार देण्याचा कट होता', किरीट सोमय्या यांचा दावा
''माझ्यावर हल्ला करण्याचा पूर्वनियोजीत कट होता. किरीट सोमय्या दोन, तीन महिने उठला नाही पाहिजे असा मार देण्याचा त्यांचा कट होता होता.
पुणे (Pune) महापालिकेत झालेल्या धक्काबुक्की आणि राडा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेवर जोरदार आरोप केले आहेत. ''माझ्यावर हल्ला करण्याचा पूर्वनियोजीत कट होता. किरीट सोमय्या दोन, तीन महिने उठला नाही पाहिजे असा मार देण्याचा त्यांचा कट होता होता. शिवसैनिकांना (Shivsainikank) तसे आदेश आले होते,'' असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिका कार्यालयात शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. या वेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सुरक्षीत ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या खाली पडले.
किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी भारतीय जनता पक्षाने कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांना धक्काबुकी केल्याचा आरोप असलेले शिवसेना (Shiv Sena) शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह आठ जण पुणे पोलिसांसमोर हजर होणार असल्याची माहिती आहे. किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, Kirit Somaiya on Sanjay Raut: किरीट सोमय्या यांचा संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, काय आहे प्रकरण? जाणून घ्या)
ट्विट
किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांसी बोलताना दावा केला आहे की, 'मला मारण्यासाठी शिवसेना हायकमांडने मिळून कट रचला असल्याचे समोर आले आहे. किरीट सोमय्या हे पुढचे तीन ते चार महिने उठला नाही पाहिजे असा मार देण्याचा कट होता. संजय राऊत आणि रश्मी ठाकरे यांच्या निकटवर्तीयांचा भ्रष्टाचार काढल्याने हा आदेश देण्यात आला' असल्याचा दावाही सोमय्या यांनी या वेळी केला आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओही शेअर केला आहे.