Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

नवी मुंबई विमानतळास शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सिडकोने मजूर केला असल्याची माहिती राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.

Balasaheb Thackeray | (File Image)

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ (Navi Mumbai Airport) नामकरणाबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवी मुंबई विमानतळास शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) दिवंगत बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सिडकोने मजूर केला असल्याची माहिती राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. या विमानतळास माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली जात होती. ही मागणी कायम असतानाच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याला मनसेचा विरोध; 'या' नेत्याचे नाव देण्याची मागणी)

प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, नवी मुंबई विमानतळास इतर कोणाचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव या आधी आला नव्हता. त्यामुळे आलेल्या प्रस्तावानुसार या विमानतळास शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय सिडकोने मंजूर केला आहे. आता काही लोक दि. बा. पाटील यांच्या नावाची मागमी करत आहेत. आम्हाला दि. बा. पाटील यांच्याबद्द आदरच आहे. त्यामुळे नवी मुंबईत भविष्यात उभारण्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या प्रकल्पास देण्याबाबतचा प्रस्ताव प्रकल्पग्रस्त कृती समितीने पाठावावा, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी एक शिष्टमंडळ महाराष्ट्रातीून दिल्लीला गेले होते. या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीबाबतची माहिती अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळाला दिली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेबाबत व्यक्त केलेल्या मताबाबत माहिती देताना एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेना हा पक्ष नेहमीच विश्वासार्ह राहिला आहे. दिलेला शब्द पाळणं ही शिवसेनेची परंपरा आहे. शिवसनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीच आम्हाला तसा आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी तसे म्हटले असावे असे पवार म्हणाले. दरम्यान, शरद पवार हे आमचे मार्गदर्श असल्याचे सांगायलाही एकनाथ शिंदे विसरले नाहीत.