Mohan Rawale Passes Away: शिवसेना माजी खासदार मोहन रावले यांचे गोवा मध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने निधन
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही दु:खद बातमी शेअर केली आहे.
शिवसेनेचे माजी खासदार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय मोहन रावले (Mohan Rawale) यांचे निधन झाले आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही दु:खद बातमी शेअर केली आहे. मोहन रावले यांचा जन्म मुंबई मधील परळ भागातील आहे. या भागात त्यांनी शिवसेना वाढवण्यात मोठी कामगिरी बजावली होती. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते पाच वेळेस खासदार म्हणून निवडून आले होते. मागील आठवड्यातच त्यांचा 72 वा वाढदिवस झाला होता. गोव्यामध्ये हद्यविकाराच्या झटक्याने त्यांचा आज मृत्यू झाला आहे.
संजय राऊत यांनी देखील ट्वीटरद्वारा आपली श्रद्धांजली अर्पण करताना, 'कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. "परळ ब्रँड "शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला. ' असं म्हणत आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील धडाडीचे नेते म्हणून मोहन रावले यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या अचानक निधन झाल्याच्या वृत्ताने शिवसैनिक, नेते यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांचं ट्वीट
1979-84 मध्ये मोहन रावले यांनी सुरूवातीला भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सांभाळले होते. त्यानंतर ते 1991 पासून 2009 पर्यंत सलग 5 वेळेस खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. Eknath Shinde यांच्या जीवावर बेतावं या धारणेतून काळी जादू करणार्या 2 तांत्रिकांना पालघर मध्ये अटक.
2013 साली पक्ष नेतृत्त्वावर टीका करत हल्लाबोल केला होता. तेव्हा त्यांच्यानंतर त्यांची पक्षातून हाकालपट्टी झाली होती. मात्र नंतर त्यांनी काही काळातच पुन्हा शिवसेनेत प्रवेश झाला होता.