Abdul Sattar on CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचे उपकार कधीच विसरणार नाही- अब्दुल सत्तार

आता तर ते मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचे आशीर्वाद हे नेहमीच आपल्यासोबत आहेत. मी तर त्यांचे आशीर्वाद आयुष्यात विसरणार नाहीत, असे कौतुकोद्गार एकनाथ शिंदे गटातील शिवसेना (Shiv Sena) आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी काढले आहेत.

Abdul Sattar (Photo Credit - Facebook)

अडचणीच्या काळात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पाठिशी ठामपणे उभा राहिले. आता तर ते मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचे आशीर्वाद हे नेहमीच आपल्यासोबत आहेत. मी तर त्यांचे आशीर्वाद आयुष्यात विसरणार नाहीत, असे कौतुकोद्गार एकनाथ शिंदे गटातील शिवसेना (Shiv Sena) आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी काढले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच बाळासाहेब ठाकरे याचे विचार घेऊन शिवसेना पुढे जात आहे, असेही अब्दुल सत्तार असे म्हणाले. दरम्यान, ज्यांना अक्कल नाही तेही टीव्हीसमोर येऊन नक्कल करतात. एकनाथ शिंदे यांनी एक आदेश दिला असता तर हे लोक राज्यसभेतही पोहोचू शकले नसते, असा टोलाही सत्तार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला.

एकनाथ शिंदे हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. जे सर्वांना देत असतात. आजवर आपण लेना बँकच पाहिलीआहे. एकनाथ शिंदे ही देना बँक आहे. एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेनेचे भविष्य आहेत. त्यांच्याच खांद्यावर शिवसेनेची जबाबदारी असेल. शिवसेनेचे धनुष्यही त्यांच्याच नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळेल, असेही उद्गार अब्दुल सत्तार यांनी काढले. मी सुरुवातीपासून काँग्रेस कार्यकर्ता राहिलो आहे. काँग्रेसमधून आमदारही अनेक काळ राहिलो आहे. मला शिवसेना माहिती होती. पण, जेव्हा मी शिवसेनेमध्ये आलो तेव्हा मला कळले. प्रामाणिक काम करणारे लोकही शिवसेनेत आहेत ही भावना मला एकनाथ शिंदे यांच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्या मनात निर्माण झाली, असे अब्दुल सत्तार म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut On Shinde Govt: औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती, संजय राऊतांची सरकारवर टीका)

अब्दुल सत्तार यांनी पुढे बोलताना म्हटले, मी 1980 पासून राजकारणा आहे. जिल्हाधिकाऱ्यापासून तसहीलदारापर्यंत आणि संसदेपासून ग्रामपंचायतपर्यंत मला सर्व नियम आणि कायदे माहिती आहेत. या सर्व अभ्यासाला स्मरुन सांगतो. एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारावूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे हे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो असे अब्दुल सत्तार म्हणाले.