शिवसेना दसरा मेळावा: राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने पहिल्यांदा आपला नेता ठरवावा- उद्धव ठाकरे

दसऱ्याच्या मुहूर्तावर पार पडणारा शिवसेनेचा दसरा मेळावा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामधील महत्वाचा भाग आहे. दरवर्षी दसऱ्याला बाळासाहेब ठाकरे शिव तीर्थावरून शिव सैनिकांना मार्गदर्शन करीत असत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा सुरु ठेवली.

09 Oct, 02:22 (IST)

तमाम महाराष्ट्रात ज्या ज्या लोकांच्या जागा चुकल्या असतील त्यांची मी माफी मागतो. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात एक शिवसैनिक हवा. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यावर अनेक नेते आमच्याकडे आले, त्यांना शिवसेनेशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता. त्यांना आमदारकी-खासदारकी नको होती त्यांना फक्त त्यांच्या समाजाचा विकास हवा होता, सत्तेत आल्यावर जो आम्ही करणार आहोत.  आम्ही उतणार नाही, मातणार नाही घेतलेला वसा सोडणार नाही.

09 Oct, 02:14 (IST)

पुन्हा सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, महाराष्ट्रातील गरिबांना 10 रुपयात जेवणाचे ताट देणार, संपूर्ण महाराष्ट्रात 300 युनिट पर्यंतच्या विजेचा दर 30 टक्क्यांनी कमी होणार, 1 रुपयामध्ये प्राथमिक आरोग्य चाचणी केंद्रे उभारणार, ग्रामीण भागातील मुलांना बस सेवा उपलब्ध करून देणार 

09 Oct, 02:05 (IST)

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने असे आतापर्यंत केले काय जे आता ते थकले आहेत? आधी तुमचा नेता कोण ते ठरवा. आतापर्यंत मगरीच्या डोळ्यात अश्रू पहिले होते मात्र आता अजित पवार यांच्या डोळ्यातही पाणी पहिले. तुमच्या कर्मामुळे तुमच्या डोळ्यात पाणी आले आहे. जे अस्त्र तुम्ही आमच्या विरुद्ध वापरले त्याच शस्त्राने तुम्हाला संपवले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी बेकार झाल्यावर त्यांना भूमिपुत्रांची आठवण झाली. जेव्हा शिवसेना भूमीपुत्रांच्या नोकऱ्याबद्दल मोर्चे काढायचा तेव्हा हेच लोक आडवे आले. शिवसनेविरुद्ध कोणी सुडाचे राजकारण केले तर ते आम्ही खपवून घेणार नाही. 

09 Oct, 01:59 (IST)

मराठा समाजाला आरक्षण दिले आहे, तसेच आम्ही धनगर समाजालादेखील देऊ करू. आदिवासी लोकांसाठी भरीव कामगिरी करू. कोणी मुस्लीम आमच्यासोबत आले तर त्यांनाही घेऊन चालू कारण शिवाजी महाराजांच्या सैन्यातही मुस्लीम होते. शिवसेनेची ताकद मी कॉंग्रेस सरकारच्या मागे लावणार नाही.  

09 Oct, 01:53 (IST)

राम मंदिराबाबत या महिन्यात कोर्टाने निर्णय दिला तर ठीक आहे, नाहीतर आमची मागणी- 'अयोध्येत रामाची मंदिर उभे करा' तशीच पुढे रेटून धरू. मला या देशात राम मंदिर हवे आहे कारण जनतेच्या सेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत 

09 Oct, 01:50 (IST)

गेली 54 वर्षे आपण ही दसरा मेळाव्याची परंपरा पाळत आहोत. दसऱ्याला शस्त्र पूजा करतात, सर्व जनता आमची शस्त्रे आहेत. त्यांचे आभार मानून विधानसभेसाठी मी शिवसेनेचा भगवा फडकणार आहे.   

09 Oct, 01:44 (IST)

संगीतकार अवधूत गुप्ते आणि गायक स्वप्नील बंदिरकर यांनी तयार केलेल्या शिवसेनेच्या गीताचे, 'आवाज कुणाचा.. शिवसेनेचा' सादरीकरण  

09 Oct, 01:39 (IST)

शिवतीर्थावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले आहे. शिवसेनेच्या मंत्री महोदयांच्या कामाच्या अहवालाचे प्रकाशन झाले आहे. 

09 Oct, 01:35 (IST)

शिवसेनच्या विजयाची सुरुवात कुडाळ आणि कणकवली मधून होणार. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आज ते स्वतः घायाळ आहेत. नोटबंदीच्या विरोधात कोणाचीही हिम्मत नव्हती, त्या विरुद्ध आवाज उठवणारा पहिला नेता म्हणजे उद्धव ठाकरे होते. काश्मीर मधून 370 रद्द व्हावे ही बाळासाहेबांची इच्छा होती त्यावर अमित शाह यांनी कृती केली - संजय राऊत

09 Oct, 01:29 (IST)

इस्रोचे यान चंद्रावर उतरण्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. मात्र आमचे आदित्य नावाचे सूर्ययान 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र फिरून मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावर उतरणार आहे. - संजय राऊत

09 Oct, 01:23 (IST)

शिवसनेच्या दसरा मेळाव्याला सुरवात झाली असून, व्यासपीठावर मान्यवर स्थानापन्न झाले आहेत. नितीन बानगुडे पाटील आपले विचार मांडत आहेत


shiv sena dussehra rally 2019दसऱ्याच्या मुहूर्तावर पार पडणारा शिवसेनेचा दसरा मेळावा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामधील महत्वाचा भाग आहे. दरवर्षी दसऱ्याला बाळासाहेब ठाकरे शिव तीर्थावरून शिव सैनिकांना मार्गदर्शन करीत असत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा सुरु ठेवली. यावर्षी विधानसभेच्या रणधुमाळीत हा दसरा मेळावा पार पडणार आहे, त्यामुळे ठाकरे परिवारातील सदस्यांच्या भाषणाची उत्सुकता अजूनच वाढली आहे. युतीमध्ये मिळालेल्या कमी जागा, आरे कॉलनीमधील झाडे तोडल्याने निर्माण झालेला वाद यावर उद्धव ठाकरे भास्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केला जात आहे.

मुंबईमधील शिवाजी पार्क येथे हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement