पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था उभारण्याचे स्वप्न पाहाचे आणि दात कोरुन पोट भरण्याचे उद्योग करायचे; शिवसेनेची मोदी सरकारवर टीका

गेल्या वर्षीही हा निर्णय घेण्यात आला होता. परंतू, त्या निर्णयात एयर इंडियाची अंशत: विक्री करण्याबाबत म्हटले होते. मात्र, या वेळी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय पाहता एयर इंडियाचे 100 टक्के समभाग विकले जाणार आहेत.

Air India | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

केंद्रातील मोदी सरकारवर शिवसेना मुखपत्र दै. सामना (Daily Saamana) संपादकीयातून जोरदार टीकास्त्र सोडले आहे. एयर इंडिया (Air India) या विमान कंपनीचे समभाग 100% विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला. त्यावरुनच सरकारवर हल्ला बोल करत शिवसेनेने टीकेचे बाण सोडले आहेत. एकीकडे २०२५ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे वादे करायचे आणि दुसरीकडे ‘कर्जबाजारी’ सरकारी कंपन्या विकून ‘दात कोरून पोट भरण्याचे उद्योग’ करायचे, असा टोला लगावत शिवसेनेने केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्याचसोबत एयर इंडिया (Air India Sale) कंपनीत काम करणारे हजारो कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भवितव्याचा प्रश्न शेवटी सर्वात महत्त्वाचा आहे, असे सांगत जेट एयरवेजसारख्या मोठ्या कंपनीचे गेल्या वर्षी जे झाले ते एयर इंडियाच्या कर्मचाऱ्यांबाबत घडू नये, असा आशावादही व्यक्त केला आहे.

काय म्हटले आहे सामना संपादकियात? (जसेच्या तसे)

दरम्यान, आर्थिक गर्तेत बुडालेली एयर इंडिया ही विमान कंपनी अखेर विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गेल्या वर्षीही हा निर्णय घेण्यात आला होता. परंतू, त्या निर्णयात एयर इंडियाची अंशत: विक्री करण्याबाबत म्हटले होते. मात्र, या वेळी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय पाहता एयर इंडियाचे 100 टक्के समभाग विकले जाणार आहेत. त्यासाठी सरकारने निविदाही मागवल्या आहे. त्यामुळे एयर इंडिया हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.