महाराष्ट्रात नवे सरकार आल्यापासून गाढवांना थोडा आराम मिळाला; शिवसेना मुखपत्रातून भाजपला टोला
या पराभवाचा दाखला देत आगोद दिल्लीचे पाहा. मगच महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहा, असा सल्लाही शिवसेनेने सामना संपादकीयाच्या माध्यमातून भाजपला दिला आहे.
दिल्लीने मार्गदर्शन केल्याशिवाय चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे महाराष्ट्रात सरकार पडण्याबाबत किंवा मध्यावधी निवडणुका लागण्याबाबत वक्तव्य करणार नाहीत. 'पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. पण, फडणवीस महाराष्ट्र सोडायला तयार नाहीत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही हे सरकार फार काळ चालणार नाही वेगैरे भविष्य मध्यंतरी सांगितले. हे सरकार स्वत:च्याच बोजाने पडेल, असे फडणवीस सांगतात. ते बरोबर आहे. कारम त्यांचे सरकार पंक्चर झाले ते स्वत:च्याच बोजामुळे. त्यांच्या सरकारने महाराष्ट्राच्या ओझ्याचे आणि बोजाचे गाढव केले होते. नवे सरकार ( Maha Vikas Aghadi Government) आल्यापासून महाराष्ट्राची घोडदौड रेसच्या घोड्याप्रमाणे सुरु आहे व गाढवांनाही थोडा आराम मिळाला आहे', अशा शब्दात शिवसेना मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामना संपादकीयातून विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर टीका करण्यात आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 मध्ये भाजपचा पुन्हा एकदा दारुन पारभव झाला. या पराभवाचा दाखला देत आगोद दिल्लीचे पाहा. मगच महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहा, असा सल्लाही शिवसेनेने सामना संपादकीयाच्या माध्यमातून भाजपला दिला आहे. दरम्यान, 'विरोधी पक्षाने त्यांच्या भूमिका जोरकसपणे मांडायला हव्यात. पण, आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका करायचीच नाही व कोणत्याही मार्गाने सत्ता काबीज करु असे वारंवार सांगणे हे मोदी यांच्या पक्षाला शोभणारे नाही. अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप असा नव्हता. बहुमताची सरकारे दाबदबावाने अस्थिर करायची व त्यातून महाराष्ट्रासारख्या राज्यात अराजकाची चूड लावायची हे तंत्र अघोरी आहे. त्यांनी धमकी दिलीच आहे. आता कृती करुन दाखवावी. डिसेंबरनंतर ते पुढची तारीख देतील. अशा तारखांवरील तारखा पडतच राहतील आणि पाच वर्षे कधी निघू गेली हे चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांना कळणार नाही. हा खेळ फारच रंजक आहे, असे सांगतानाच दादा खेळत राहा, वेळ चांगला जाईल', असा टोलाही समना संपादकीयातून चंद्रकांत पाटील यांना लगावण्यात आला आहे.
दरम्यान, 'राज्यातल्या महाविकास आघाडीकडे चांगले बहुमत आहे. तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले, पण हा वेगळा विचार महाराष्ट्राच्या विकासाचा आहे.तीन पक्षांमध्ये आपापसात कुरुबुरी नाहीत. पाच वर्षे हे सरकार चालेल हे नक्की. भारतीय जनता पक्षाने कितीही तीर मारले तरी माशाचा डावा डोळा काही घायाळ होणार नाही. त्यामुळे एक प्रकारची निराशा येणे स्वाभाविक आहे. मग हे सरकार कसे पाडायचे व मुदतपूर्व निवडणुका कधी घ्यायच्या यावर एखादे कारस्थान शिजवले जात आहे काय?'असा सवाल उपस्थित करत पाटलांच्या (चंद्रकांत पाटील) बोलण्यातून तेच दिसते, असा संशयही सामना संपातकीयातून व्यक्त करण्यात आला आहे. (हेही वाचा, भाजप ही देशावरील आपत्ती, काहीही करुन ती दूर करणे आवश्यक: शरद पवार)
'डिसेंबरमध्ये मुदतपूर्व निवडणुका घ्यायचे असे भाजपच्या अंत:स्थ गोटात ठरवलेच असेल तर त्यांना आधी संसदीय लोकशाहीचा गळा घोटावा लागेल व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसावा लागेल. सरकार बहुमताचे आहे. सरा महिन्यांनंतर अविश्वास ठराव आणला तरी 170 चे बहुमत कायम राहील. मग पाटलांचे स्वप्न साकार कसे होणार? राज्यपालांना हाताशी धरुन गृहखात्याच्या माध्यमातून त्यांना हे सरकार 'बेइमानी' करुन बरखास्त करावे लागेल. त्यासाठी थातुरमातूर कारणे शोधावी लागतील. हे 'पाप' करण्याचा प्रयत्न ते जेव्हा करतील तेव्हा महाराष्ट्रात आगडोंब उसळल्याशिवाय राहणार नाही. चंद्रकांत पाटील म्हणतात, डिसेंबरनंतर आमचे सरकार येईल. याचा दुसरा अर्थ असा की, राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे हरएक प्रयोग करायचे. आमदारांना आमिषे किंवा धाकधपटशा दाखवायचा. मोहिनी प्रयोग करायचे. पण या मोहिनी विद्येस कोणी फशी पडेल असे महाराष्ट्राचे वातावरण नाहीट, असा इशाराही भाजपला सामना संपादकीयातून देण्यात आला आहे.