Shiv Sena Criticism on BJP: देशात सुरु असलेल्या खुळचट,बुळचट प्रकारावरुन ऑलिम्पिकमध्ये 'पोरखेळ' प्रकारात सूवर्णपदक हमखास मिळेल, शिवसेनेचा टोला

तिला जिवे मारण्याची धमकी दिली. दहशतीखाली जगणाऱ्या त्या अबलेस झेड सुरक्षा द्यायला हवी होती. तसे का झाले नाही?, असेही सामना संपादकीयात म्हटले आहे.

Saamana Editorial (PC - File Image)

राज्यात सुरु असलेल्या विविध घटनांवरुन शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना (Saamana Editoria) संपादकीयातून भाजप (BJP) आणि अनेकांना टोला लगावण्यात आला आहे. शिवसेनेने भाजपला टोला लगावताना म्हटले आहे की, देशात सुरु असलेल्या खुळचट,बुळचट प्रकारावरुन ऑलिम्पिकमध्ये 'पोरखेळ' प्रकारात सूवर्णपदक हमखास मिळेल. जळगाव, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक येथे भाजपच्या सहभागाने झालेल्या अन्याय, अत्याचाराबाब विविध मुद्द्यांचा उल्लेख करत शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. वर दिल्यापैकी कुठल्याही घटनेच्या विरोधात रस्त्यांवर उतरून भाजपचे लोक निषेध करताना चुकूनमाकूनही दिसले नाहीत. हे सर्व नसते उद्योग त्यांनी फक्त महाराष्ट्रासाठीच राखून ठेवले आहेत, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

सामना संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे

उत्तर प्रदेशात गोमांस प्रकरणात ज्या अखलाखची हत्या झाली, त्याचा मुलगाही देशाच्या लष्करातच सेवा बजावत आहे. भाजपशासित योगींच्या राज्यात ६४ वर्षांचे निवृत्त सैन्य अधिकारी कॅ. अमानुल्ला व त्यांच्या पत्नीची घरात घुसून जमावाने हत्या केली. त्याबद्दल पंतप्रधान, संरक्षणमंत्री साहेबांनी निवृत्त कॅप्टनच्या पत्नीस फोन करून चर्चा वगैरे केल्याचे वाचनात आले नाही. मागील चोवीस तासांत कर्नाटक, यूपीमध्ये चार पुजाऱ्यांचे खून झाले आहेत.

मुंबई पोलिसांचा अवमान करणाऱ्या नटीला ‘वाय-प्लस’ अशी जोरदार सुरक्षा व्यवस्था हिमाचल व केंद्र सरकारने दिली. पण हिमाचलातील कांगरा भागात एका विवाहित महिलेवर सात जणांनी सामुदायिक बलात्कार केला. तिला जिवे मारण्याची धमकी दिली. दहशतीखाली जगणाऱ्या त्या अबलेस झेड सुरक्षा द्यायला हवी होती. तसे का झाले नाही?, असेही सामना संपादकीयात म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif