..तर भाजप आणि देवेंद्र फडणीस यांच्या सहकाऱ्यांवर मुखवटे खाजवण्याची वेळ येणार नाही: शिवसेना

अर्थात सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला नाही. याचा अभ्यास भाजप (BJP), फडणवीस (Devendra Fadnavis) व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तर, स्वत:च्याच चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही, असे सामनात म्हटले आहे.

Former Chief Minister Devendra | (Photo Credits: Twitter/ANI)

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेने 2014 मध्येच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत संपर्क साधला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केल्यावर भाजपच्या हातात चांगलेच कोलीत मिळाले. त्यानुसार भाजपने शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडत 'शिवसेनेचा खरा चेहरा पुढे आला' असे म्हटले. भाजपच्या या टीकेला शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना संपादकीयातून (Saamana Editorial) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत. बोलायचे एक व करायचे दुसरेच हे 2019 सालीही झाले. याचे दृश्य फळ म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला व गुरुमहारांजांनी प्रयत्न केले तरी, शरद पवार यांनी भाजपशी कुरघोडी होऊ दिली नाही. अर्थात सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला नाही. याचा अभ्यास भाजप (BJP), फडणवीस (Devendra Fadnavis) व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तर, स्वत:च्याच चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही, असे सामनात म्हटले आहे.

काय म्हटले आहे सामनामध्ये? (जसेच्या तसे)

मुखवट्याचे कारखाने भाजपकडेच होते. लॉजिक म्हमाल तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने आजच्याप्रमाणए एकत्र यावे असे जबरदस्तीनेठरवले असतेत तरी आकडा जमत नव्हता. मारुन मुटकून 149 चा आकडा होता वत तो धोकादायक होता. ते काठावरचे बहुमत होते. व घडेाजारात मशहूर असलेले भजपवाले साम-दाम-दंड भेद नीतीचा वापर करुन तोडफोड करायला तयार होते. फडणवीस यांनी आणखी एक गोष्ट जमजून घेतली पाहिजे. 2014 साली राष्ट्रवादीने भाजपला उघड पाठिंबा दिला व त्यामागे गुरुमहारांजांची इच्छा व दिशा होती. हे सत्य स्वीकारले तर शिवसेच्या चेहऱ्यावर ओरखडे मारण्यापेक्षा भाजपने स्वत:चा खरा चेहरा आरशात पाहणे गरजेचे आहे. 2014 सालचीच शिवसेना आजही आहे. भाजपला 105 असूनही विरोधी बाकांवर पसण्याची वेळ आली. कारण भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत. बोलायचे एक व करायचे दुसरेच. हे 2019 सालीही झाले. त्याचे दृश्य फळ म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला व गुरुमहारांजांनी प्रयत्न केले. तरी शरद पवारांनी भाजपची कुरघोडी या वेळी होऊ दिली नाही. अर्थात सोनिया गांधी यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला नाही. 2014 साली अशा प्रस्तावांना कागदाच्या चुरगळलेल्या कपट्याचीही किंमत नव्हती. याचा अभ्यास फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तर स्वत:च्या चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.