Shiv Sena On Amit Shah-Sharad Pawar Meeting: न झालेल्या भेटीवरून अमित शाह यांनी पतंग उडवले- शिवसेना

ही भेट अत्यंत गुप्त असल्याची चर्चा असल्याने संभ्रम आणखी वाढला आहे. दरम्यान, या सगळ्या परिस्थितीत आता शिवसेना मुखपत्र दै. सामना संपादकीयातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

Amit Shah-Sharad Pawar Meetin | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि शरद पवार (Sharad Pawar ) यांच्यात झालेल्या कथीत भेटीवरुन राजकारण जोरात ढवळून निघाले आहे. ही भेट अत्यंत गुप्त असल्याची चर्चा असल्याने संभ्रम आणखी वाढला आहे. राष्ट्रवादीकडून (NCP) ही भेट झाल्याचे नाकारण्यात आले आहे. तर भाजपकडून भेट झाल्याबाबत स्पष्ट सांगितले गेले नाही. तरी संभ्रम कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या सगळ्या परिस्थितीत आता शिवसेना मुखपत्र दै. सामना (Saamana Editorial) संपादकीयातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. पवार-शहांची भेट झाली नाही. त्या न झालेल्या भेटीबद्दल अहमदाबादेत स्वतः अमित शहा यांनी पतंग उडवले. पत्रकारांनी त्यांना भेटीबद्दल विचारले तेव्हा शहा म्हणाले, ”अशा गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात.”महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील वगैरे नेते तर त्याच पतंगाच्या मांजावरून इतके वर गेले की, ”मोदी-शहा, नड्डा घेतील तो निर्णय आपल्याला मान्य,” असे सांगून आणखी एका पहाटेच्या शपथविधीच्या स्वप्नरंजनात दंग झाले, अशा शब्दांत सामना संपादकीयातून टोलेबाजी करण्यात आली आहे.

सामनामध्ये काय म्हटले