Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक प्रचारासाठी शिवसेना स्टार प्रचारकांची नावे जाहीर

निलम गोऱ्हे, लक्ष्मण वडले, नितीन बानगुडे पाटील, वरुन सरदेसाई, राहुल लोंढे या नेत्यांच्या नावाचा समावेश शिवसेना स्टार प्रचारक म्हणून करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credits: ANI)

Lok Sabha Elections 2019: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (Shiv Sena) लोकसभा निवडणूकीस सामोरे जात आहे. लोकसभेसाठी शिवसेनेने पक्षाची उमेदवार यादी जाहीर केली. त्यानंतर शिवसेनेकडून आता स्टार प्रचारकांची (Shivsena Star Campaigner) यादीही जाहीर करण्यात आली आहे. या यादीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thakre) हे प्रमुख स्टार प्रचारक असणार आहेत. या दोन प्रमुख नेत्यांसह इतर 20 जणांची नावे पक्षाने स्टार प्रचारक म्हणून जाहीर केली आहेत.

शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, अनंत गीते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, एकनाथ शिंदे, आदेश बांदेकर, गुलाबराव पाटील, विजय शिवतारे, सुर्यकांत महाडीक, विनोद घोसाळकर, डॉ. निलम गोऱ्हे, लक्ष्मण वडले, नितीन बानगुडे पाटील, वरुन सरदेसाई, राहुल लोंढे या नेत्यांच्या नावाचा समावेश शिवसेना स्टार प्रचारक म्हणून करण्यात आला आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: राजेंद्र गवित शिवसेना पक्षाचे पालघर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार; 'मातोश्री'वर शिवसेनेत प्रवेश)

ट्विट

शिवसेना - भाजप हे दोन्ही पक्ष युती करुन लोकसभा निवडणूक लढवत आहेत. दोन्ही पक्षांनी आपाले उमेदवार घोषीत स्वतंत्रपणे घोषीत केले. मात्र, दोन्ही पक्षांनी युतीचा नारळ मात्र एकत्र फोडला.