Shiv Sena Vs BJP: इंधन दरवाढीवरुन मुंबईत शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, पोलिसांना करावी लागली मध्यस्थी

त्यानंतर येथे पेट्रोल प्रतिलिटर 100.19 रुपये आणि डिझेल 92.17 रुपये दराने विकले जात आहे.

Shivsena | (Photo courtesy: archived, edited images)

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या (Petrol Price In Mumbai) दरात 25 पैसे आणि डिझेलवर 30 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर येथे पेट्रोल प्रतिलिटर 100.19 रुपये आणि डिझेल 92.17 रुपये दराने विकले जात आहे. मे महिन्यात आतापर्यंत 16 दिवस इंधनाच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. परंतु कपात एकदाही झालेली नाही. इंधनाच्या या वाढत्या दरवाढीवरून शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांनी मुंबईतील भाजप कार्यलयासमोर (BJP Mumbai Office) निषेध करणारे होर्डिंग लावले आहे. या होर्डिंगवरून शिवसैनिक आणि भाजपमध्ये चांगला वाद पेटला असून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ऐकमेकांना भिडल्याचे एका व्हिडिओत दिसत आहे. या सदर्भात न्यूज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.

दक्षिण मुंबईतील भाजपच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचा फोटो असलेला होर्डिंग लावला आहे. या होर्डिंगवर म्हटले आहे की, हौस फिटली एकदाची बाबा परत तुझ्या नादी नाही लागणार! एक #देशप्रेमी अब की बार लांबून नमस्कार. या होर्डिंगवरून शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली आहे. एवढेच नव्हेतर, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे सुद्धा पाहायला मिळाले आहे. हे देखील वाचा- Pune: शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांचे लसीकरण कधी? महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली महत्वाची माहिती

याआधी ठाणे शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी होर्डिंगबाजी करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. या होर्डिंग्जवर दाढीवाल्या फलंदाजाचे चित्र आहे. तसेच “मॅन ऑफ दी मॅच; पेट्रोल 100 नॉट आऊट; अच्छे दिनाच्या शुभेच्छा” असा खोचक मजकूर या होर्डिंग्जवरवर लिहिण्यात आला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर या महिन्यात 4 तारखेपासून इंधानच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. ज्यामुळे सर्वसामन्यांना मोठा फटका बसला आहे.