शिरुर लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: पहिल्या फेरीत अमोल कोल्हे आघाडीवर; शिवाजीराव अढळराव विरुद्ध अमोल कोल्हे यांच्यात मताधिक्यांची रंगत लढणार

महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे.

Dr. Amol Kolhe | (Photo Credit : Facebook)

Shirur Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. या मतदारसंघातून शिवसेना-भाजप युती (Shivsena-BJP) उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि वंचित बहुजन आघाडी (BVH) पक्षाचे उमेदवार राहुल ओव्हाळ (Rahul Ovhal) यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, आघाडीसाठी प्रतिकुल अंदाज दर्शवले आहेत. याच पार्श्वभुमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी ठरणार आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

शिरुर मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. या मतदारसंघातून उभे असलेले उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, अमोल कोल्हे आणि राहुल ओव्हाळ यांच्यामध्ये लढत रंगली होती. दरम्यन या दिवशी शिरुर येथे 59.55 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली होती. तर तब्बल सहा विधानसभा एकत्र करुन बसलेला शिरुर लोकसभा मतदारसंघ हा जवळपास 80 टक्के ग्रामीण भाग आहे. या भागात आढळराव पाटील यांचा जनसंपर्क आणि जेष्ठत्व यामुळे प्रभाव आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हे त्यांना टक्कर देत असले तरीही त्यांच्याकडे उत्तम वत्कृत्व कला आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व या गोष्टींचा त्यांना फायदा होणार असल्याची संभाव्यता आहे. त्यामुळे कोल्हे यांचा मार्ग कठीण असला तरी अशक्य नाही.(लोकसभा निवडणूक 2019: आगोदर मतदान मगच उमेदवारी, अजित पवार यांच्याकडून डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीसाठी हटके फंडा)

चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी महाराष्ट्रातील 17 मतदारासंघामध्ये मतदान घेण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अन्य पक्षाच्या उमेदवारांनी यंदा जोरदार प्रचारसभेतून मतदारांना आपवल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आज येणाऱ्या निकालावरुन कोणाच्या बाजूने जनमताचा कौल लागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



संबंधित बातम्या

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांत नाराजी नाट्य सुरु; छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत, रवी राणा सह पहा कोण कोण झाले खट्टू

IND W Beat WI W 1st T20I Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी केला पराभव, तीतास साधूची प्राणघातक गोलंदाजी