शिर्डी मध्ये 'ठाकूर' कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाने खळबळ; दोघांची प्रकृती चिंताजनक
शिर्डी येथील निमगाव शिवारात ठाकूर कुटुंबातील तिघांची किरकोळ वादातून गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून जखमींपैकी दोघांची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Shirdi Triple Murder Case: शिर्डी (Shirdi) येथे किरकोळ वादामधून एकाच कुटूंबातील तीन व्यक्तींची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सकाळी साडे सहाच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. अर्जुन पन्हाळे (Arjun Panhale) असे आरोपीचं नाव असून किरकोळ वादामधून हत्या झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. ठाकूर कुटूंबातील तिघांचा यामध्ये मृत्यू झाला असून उर्वरीत दोघांवर शिर्डी संस्थान रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
ANI Tweet
Shirdi: Three people of a family murdered, two others injured. The accused Arjun Panhale has been arrested. Police begin investigation. #Maharashtra pic.twitter.com/W6av8fhb5D
— ANI (@ANI) July 13, 2019
मीडीया रिपोर्ट्सनुसार, शिर्डी येथील निमगाव शिवारात ठाकूर राहत होते. आज (13 जुलै) दिवशी सकाळी साडे सहाच्या सुमारास अर्जुन पन्हाळे या आरोपीने ठाकूर कुटुंबीयांवर कोयत्याने वार केले. त्यांचे गळे चिरले. ठाकूर दांम्पत्यांच्या 16 वर्षीय मुलीची अर्जुनने केलेल्या वारांमध्ये हत्या झाली आहे. तर राजेंद्र ठाकूर (वय 35 वर्षे) आणि तावू ठाकूर (वय 18 वर्षे) यांची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यामध्ये या कुटूंबातील सहा वर्षीय चिमुकली आहे. तर मृतांमध्ये नामदेव ठाकूर, दगाबाई नामदेव ठाकूर, खुशी ठाकूर यांचा समावेश आहे. शिर्डी पाठोपाठ नवी मुंबई आणि नागपूर मध्ये हत्याकांड, पोलीस तपास सुरु
ठाकूर कुटुंबीयांची हत्या केल्यानंतर आरोपी शेजारच्या खोलीत जाऊन बसला होता. शिर्डी पोलिसांनी अर्जुनला ताब्यात घेतले असले तरीही या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2019 10:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

