Shirdi Airport Reopen: शिर्डीतील विमानतळ उद्यापासून सुरु होणार, पहा येथे वेळापत्रक

अशातच आता कोरोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेले शिर्डीतील विमामतळ आता उद्यापासून (10 ऑक्टोंबर) सुरु होणार आहे

Airlines | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

Shirdi Airport Reopen:  राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता हळूहळू काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली गेली आहे. अशातच आता कोरोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेले शिर्डीतील विमामतळ आता उद्यापासून (10 ऑक्टोंबर) सुरु होणार आहे. त्याचसोबत मंदिरे सुद्धा सुरु झाल्याने भाविकांना आता शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेता सुद्धा येणार आहे. तर मंदिरे सुरु झाल्यानंतर विमानसेवा सुरु होणे गरजेचे होते. त्यामुळेच आता विमानतळ विकास प्राधिकरणाने हे विमानतळ नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिर्डी विमानतळावर सुरुवातीला SpiceJet, IndiGo Airlines ची सेवा दिल्ली हैदराबाद आणि चेन्नई ठिकाणसाठी असणार आहे. त्यानुसार विमानाचे वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यापूर्वी हे वेळापत्रक पाहावे लागणार आहे.(Pune: पुणे जिल्ह्यात सोमवारपासून कॉलेजेस, 100 टक्के क्षमतेने कार्यालये, पर्यटनस्थळे सुरू; 22 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्याचा प्रयत्न)

-10 ऑक्टोंबरला सकाळी 11.30 वाजता दिल्ली येथून शिर्डीत पहिले विमान दाखल होणार

-दुपारी 12.30 वाजता हेच विमान दिल्लीकडे रवाना होणार

-दुपारी 2.30 वाजता हैदराबाद येथून शिर्डीत विमान येणार असून दुपारी 3 वाजता पुन्हा हैदराबादला जाणार

-दुपारी 4 वाजता चैन्नई येथून शिर्डीत विमान येणार असून दुपारी 4.30 वाजता पुन्हा चैन्नईकडे रवाना होणार

दरम्यान, विमानाने प्रवास करताना कोरोनाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचसोबत मंदिरात भाविकांना प्रवेश करण्यासाठी सुद्धा प्रशासनाकडून नियमावली जाहीर केली गेली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif