Sanjay Shirsat Heart Attack: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना ह्रदयविकाराचा झटका, तातडीने एअर अंम्ब्युलन्सच्या मदतीने मुंबईच्या दिशेने रवाना

आमदार संजय शिरसाट यांची प्रकृती अचनाक खालावली असुन त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे.

Sanjay Shirsat | Photo Credit - Twitter

शिंदे गटाचे शिलेदार अशी ओळख असलेले आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांची प्रकृती अचनाक खालावली असुन त्यांना ह्रदयविकाराचा (Heart Attack) झटका आला आहे. औरंगाबादेत (Aurangabad) ते त्यांच्या निवास्थानी असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. तात्काळ उपचारासाठी त्यांना शाहनुरवाडी दर्गा (Shahnurwadi Darga) येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये (Sigma Hospital) दाखल करण्यात आले. मध्यरात्री त्यांच्यावर येथेच उपचार करण्यात आलेत पण त्यांची प्रकृती बघता आज सकाळी त्यांना उपचारासाठी एअर अंम्ब्युलन्सच्या (Air Ambulance) मदतीने मुंबईच्या (Mumbai) दिशेने रवाना करण्यात आले. तरी आमदार संजय शिरसाट यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबासह त्यांचा मित्रपरिवार असल्याची माहिती मिळत आहे.

 

गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती बिघडली होती. काल  त्यांना हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली. सध्या संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला (Mumbai) हलवण्यात आले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital Mumbai) संजय शिरसाट यांना दाखल केल्या जाईल अशी माहिती मिळत आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी रुग्णालयात जाणार आहेत. (हे ही वाचा:- Anil Deshmukh and Sanjay Raut: अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी)

 

संजय शिरसाट हे औरंगाबादचे आमदार असुन एकनाथ शिंदे यांच्या बंडात त्यांनी महत्वाची भुमिका निभवली आहे. मंत्रीमंडळ विस्तारा दरम्यान संजय शिरसाट यांना नक्कीचं मंत्रीपद मिळणार अशी चर्चाही झाली होती पण नंतर मंत्रीपद न मिळाल्याने संजय शिरसाट यांच्या औरंगाबादेतील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif