Shark Attack On Palghar Man: पालघर येथे मासेमारी करताना शार्कचा हल्ला, मच्छिमाराच्या पायाला मोठी जखम

या हल्ल्यात शार्कने मच्छिमाराच्या पायाचा लचका तोडल्याने त्याला मोठी जखम झाली आहे. तरुणास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Shark Attack | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

पालघर (Palghar) जिल्ह्यातील वैतरणा खाडीमध्ये मासेमारी करत असताना एका तरुण मच्छिमारावर शार्कने हल्ला (Shark Attacks Man) केला. या हल्ल्यात शार्कने मच्छिमाराच्या पायाचा लचका तोडल्याने त्याला मोठी जखम झाली आहे. तरुणास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काही काळानंतर शार्क मासाही मृतावस्थेत आठळून आला. ज्यामुळे परिसरत खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (13 फेब्रुवारी) सायंकाळी सातच्या सुमारास मनोर येथील वैतरणा नदी पात्रात घडली.

तरुणावर सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचार

प्राप्त माहितीनुसार, विकी गोवारी असे पीडित तरुणाचे नाव आहे. तो 22 वर्षांचा आहे. शार्कच्या हल्ल्यात विकी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विकी हा मंगळवारी दुपारच्या सुमारास मासेमारीसाठी पालघर जिल्ह्यातील खाडीत उतरला. त्याच्यासोबत इतरही काही तरुण होते. मच्छीमारीदरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास ते मनोर येथील सायलेंट हॉटेलजवळ वैतरणा खाडीत आले. या वेळी शार्कने अचानक त्याच्यावर हल्ला केला. सांगितले जात आहे की, शार्कचे वजन साधारण 200 किलोग्रॅम पेक्षाही अधीक होते. (हेही वाचा, Shocking: इजिप्तच्या हर्घाडा बीचवर पोहताना व्यक्तीला शार्कने जिवंत गिळले; किनाऱ्यावरील लोकांनी पाहिली धक्कादायक घटना)

शार्कने तोडला पायाचा लचका

शार्कने विकीच्या पायाचा लचका तोडला. हा हल्ला इतका भयावह होता की, ज्यामध्ये विकीच्या पायाचा एक ते दीडफूट इतका भाग कुरतडला गेला. ज्यामुळे प्रचंड प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यामुळे विकी बेशुद्ध झाला. त्याला मनोर येथी आस्था रुग्णालात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करु त्याला पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर त्याला सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, Watch Shocking Moment: फिशिंग करताना अचानक भल्यामोठ्या Shark ने जहाजावर मारली उडी, जाणून घ्या काय घडले पुढे (Viral Video))

शार्क हा महासागरात आढळणाऱ्या माशाची एक प्रजात आहे. शार्क जगभरातील महासागरांमध्ये आढळतात. जे विविध आकार, आकार आणि प्रजातींमध्ये आढळतात, ज्यामध्ये मोठ्या व्हेल शार्कपासून भयंकर ग्रेट व्हाईट शार्कपर्यंतचा समावेश आहे.

शार्कचे काही प्रकार आहेत ते खालील प्रमाणे

ग्रेट व्हाईट शार्क (Carcharodon carcharias): त्याच्या शक्तिशाली जबड्यांमुळे आणि मोठ्या आकारासाठी ओळखला जाणारा, ग्रेट व्हाईट शार्क हा शार्कच्या सर्वात प्रसिद्ध प्रजातींपैकी एक आहे.

हॅमरहेड शार्क (स्फिर्निडे फॅमिली): हॅमरहेड शार्क त्यांच्या विशिष्ट सपाट डोक्यांद्वारे सहज ओळखता येतात, जे हातोड्याच्या आकारासारखे असतात. ते जगभरातील उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण पाण्यात आढळतात.

टायगर शार्क (गॅलिओसेर्डो क्युव्हियर): त्याच्या विशिष्ट पट्टेदार पॅटर्नसाठी नाव दिलेले, टायगर शार्क ही एक मोठी शिकारी प्रजाती आहे.

व्हेल शार्क (रिनकोडॉन टायपस): व्हेल शार्क ही जगातील सर्वात मोठी माशांची प्रजाती आहे, जी 40 फुटांपेक्षा जास्त लांबीपर्यंत वाढते.

नर्स शार्क (Ginglymostomatidae फॅमिली): नर्स शार्क हे सामान्यतः उथळ उष्णकटिबंधीय पाण्यात आढळणारे तळाशी राहणारे शार्क आहेत. ते तुलनेने नम्र आहेत आणि त्यांच्या आळशी वर्तनासाठी ओळखले जातात.

शार्क सागरी परिसंस्थेमध्ये सर्वोच्च भक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात.ज्यामुळे सागरी अन्न जाळ्यांचे संतुलन राखण्यात मदत होते. तथापि, जास्त मासेमारी, अधिवासाचा नाश आणि इतर मानवी कृतीमुळे शार्कच्या अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. शार्क लोकसंख्या आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत.