'कुछ कुछ होता है' चित्रपटातील सीन शेअर करत नागपूर पोलिसांनी मजेशीर मीम्सद्वारे सांगितलं मास्क घालण्याचं महत्व
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणुने (Coronavirus) संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. जगभरातील लाखो लोक कोरोना विषाणुच्या जाळ्यात अडकले आहेत. भारतातदेखील दीड लाखाहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून विविध सुचना दिल्या जात आहेत. अशातचं नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) घराबाहेर पडताना कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क घालणं किती गरजेचं आहे, हे सांगण्यासाठी शाहरूख खानची भूमिका असलेल्या ‘कुछ कुछ होता है' (Kuch Kuch Hota Hai) या हिंदी चित्रपटातील एका सीनचे मजेशीर मीम्स (Memes) बनवलं आहे. या मीम्समध्ये शाहरूख खानने काजोल ला मीठी मारलेली असून राणी मुखर्जीचा हात पकडला आहे.

नागपूर पोलिसांनी या मीम्समधील शाहरुख खान ला 'यू' (तुम्ही), काजोल ला ‘गोइंग आउट' (बाहेर जाणं) आणि राणी मुखर्जी ला ‘मास्क' चं नाव देत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'बाहेर जाताना मास्क लावायचं विसरू नका,' असा संदेश दिला आहे. (हेही वाचा - Fact Check-Crows' Attack At Supermarket in Saudi 'Beginning End of The World: सौदी येथील सुपरमार्केटवर कावळ्यांचा हल्ला 'जगाच्या अंतची सुरुवात?' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य)
दरम्यान, हे मजेशीर मीम्स नागपूर पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केलं आहे. 'इस बंधन को टूटने न दें...क्योंकि बहुत कुछ होता है,' असं कॅप्शन नागपूर पोलिसांनी पोस्टला दिलं आहे. नागपूरमध्ये विना मास्क शिवाय बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बगडा उगारला आहे.
नागपूर पोलिसांनी शेअर केलेलं हे मीम्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी खरं तर या मजेशीर मीम्सचं पालन करणं गरजेचं आहे. नागरिकांमध्ये मास्क घालण्याविषयी जागृती घडवून आणण्यासाठी हे मीम्स उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हे मीम्स जास्तीत-जास्त लोकांना शेअर करणं गरजेचं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)