Share Market: शेअर मार्केट मध्ये आज सुद्धा तेजी, सेनसेक्स 50 हजारांच्या पार
त्यानंतर सुद्धा शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली होती. तर आज ही शेअर मार्केटमध्ये सेनसेक्स 50 हजारांच्या पार गेला आहे.
Share Market: 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सादर केला. त्यानंतर सुद्धा शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली होती. तर आज ही शेअर मार्केटमध्ये सेनसेक्स 50 हजारांच्या पार गेला आहे. शेअर मार्केट सुरु होताच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये सेनसेक्स 1403 अंकांच्या वरती 50,004.06 वर स्थिरावला. याच पद्धतीने निफ्टी 406 अंकानी वरती 14,687.35 वर स्थिर झाला. यापूर्वी 21 जानेवारीला सेनसेक्स 223.17 अकांनी वाढून 50,015.29 वर खुलला होता. तर निफ्टीची सुरुवात 14,707.70 च्या स्तरावर गेला होता.
तर सकाळी 9.32 वाजताच्या सुमारास सेनसेक्स 1335.46 अंकांनी वाढून 49936.07 च्या स्तरावर पोहचला. नॅशनल स्टॉक एक्सचेंचा निफ्टी 390.60 अंक म्हणजेच 2.74 टक्क्यांच्या तेजीसह 14671.80 च्या स्तरावर होता.सुरुवातीला सेनसेक्स 751.66 अंकांनी वाढून 49452.27 स्तरावर खुलला होता. तर निफ्टी 199.40 अंक म्हणजेच 1.40 टक्के तेजीसह 144480.60 च्या स्तरावर खुलला होता. आज 1027 शेअर मध्ये तेजी दिसली आणि 171 शेअर्समध्ये गिरावट झाली होती. तसेच 46 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नव्हता. (Share Market on Budget Day Update: केंद्राच्या अर्थसंकल्पाला सुरुवात झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये जबरदस्त तेजी, येथे पहा अपडेट्स)
Tweet:
दरम्यान, काल बीएसईचा इंडेक्स पाच टक्क्यांनी काल उंचावत बंद झाला होता. तर 24 वर्षातील सर्वाधिक मोठी तेजी काल अर्थसंकल्पाच्या वेळी दिसून आली. 1 फेब्रुवारीला 2314.84 अंकाच्या वरती 48600 च्या स्तरावर बंद झाला होता. तर निफ्टी 646.60 अंकांनी वाढून 14281.20 च्या स्तरावर बंद झाला होता.