Share Market on Budget Day Update: केंद्राचा अर्थसंकल्प 2021-22 अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून लोकसभेत सादर केला जात आहे. तर बजेट सादर करण्याच्या सुरुवाती पासूनच आज शेअर मार्केटमध्ये जबरदस्त तेजी पहायला मिळाली आहे. त्यामुळे 12 वाजता सेनसेक्स जवळजवळ 899 अंकांच्या जवळ पोहचल्याचे दिसून आला असून तो 47,185.75 वर स्थिरावला आहे. तर निफ्टी सुद्धा 237 अंकांनी वाढून 18881 वर पोहचला आहे. तर मुंबईतील शेअर मार्केट बद्दल अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आयसीआयसी बँक, सन फार्मा, इंडसंड बँक, भारती एअरटेल, हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, भारतीय स्टेट बँख प्री ओपनिंगमध्ये सर्वात वरती राहिल्याचे दिसून आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जेव्हा बजेट सादर करण्यास सुरुवात केली त्यावेळी बाजारात तेजी आल्याचे दिसून आले.(Union Budget 2021 Live Updates In Marathi: 5 कोटी पर्यंत उत्पन्न असलेल्यांचेच अकाऊंट ऑडिट केले जातील : निर्मला सीतारमण)
Tweet:
Sensex surges 899.98 points, currently at 47,185.75. pic.twitter.com/ta9GEGotls
— ANI (@ANI) February 1, 2021
दरम्यान, यंदाचा अर्थसंकल्प ऐतिहासिक आणि खास असणार आहे.कारण अर्थमंत्री निर्मला सीतारमण या तिसऱ्यांदा बजेट सादर करणार आहे. त्याचसोबत कोरोना व्हायरसच्या महासंकट काळात यंदाच्या बजेटला अधिक महत्व असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे. तसेच बजेट यंदा पेपरलेस असणार असल्याने त्यामध्ये विविध क्षेत्रासाठी काय तरतूदी केल्या जात आहेत. तर बजेटवर आता जनता आपले काय मत व्यक्त करणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.