Sharad Pawar Feels Unwell: बारामतीत बैठकीदरम्यान शरद पवारांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला; पुणे जिल्ह्याचा दौरा रद्द

शरद पवार शनिवारी संध्याकाळी विद्या प्रतिष्ठान या त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या ट्रस्टच्या सभेला गेले होते. यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि डॉक्टरांनी त्यांची तातडीने तपासणी केली.

Sharad Pawar Feels Unwell: बारामतीत बैठकीदरम्यान शरद पवारांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला; पुणे जिल्ह्याचा दौरा रद्द
NCP Chief Sharad Pawar (File Photo)

Sharad Pawar Feels Unwell: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. शरद पवार यांना पुणे जिल्ह्यातील त्यांच्या गावी बारामती येथे झालेल्या बैठकीदरम्यान अस्वस्थ वाटले. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तत्काळ तपासणीनंतर विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

शरद पवार शनिवारी संध्याकाळी विद्या प्रतिष्ठान या त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या ट्रस्टच्या सभेला गेले होते. यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि डॉक्टरांनी त्यांची तातडीने तपासणी केली. दिवाळीनिमित्त शरद पवार कुटुंबासह बारामतीत होते. (हेही वाचा -Eknath Khadse Health Update: Angioplasty नंतर हॉस्पिटल मधून एकनाथ खडसेंनी CM Eknath Shinde यांचे मानले आभार; जीवनदान मिळाल्याचा प्रसंग सांगताना भावनिक!)

सध्या तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यांचा रविवारी पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे होणारा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधीही शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा दौरा अनेकदा रद्द झाला आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पक्षाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2023 10:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).