IPL Auction 2025 Live

Sharad Pawar Birthday Party: शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला कार्यकर्त्यांचा तुफान राडा; पोलिसांना करावा लागला लाठीमार

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पवारांच्या वाढदिवसानिमित्त 81 किलोचा केक कापला.

File Image of NCP chief Sharad Pawar | (Photo Credits: PTI)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा 80 वाढदिवस राज्यभरात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील शरद पवार हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत, असे म्हणत त्यांना वाढदिवसाच्या सुभेच्छा दिल्या होत्या. तर, दुसरीकडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पवारांच्या वाढदिवसानिमित्त 81 किलोचा केक कापला. पण हा केक घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी अशी काही गर्दी केली की पोलिसांना लाठीमार करावा लागला आहे. हा प्रकार धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ परळी येथे घडला आहे.

धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अभिनेता गोविंदा यांच्यासह त्यांच्या पत्नीनेही उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि गोविंदाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, धनंजय मुंडे आणि गोविंदा यांच्या हस्ते शरद पवार यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला होता. मात्र, हा कार्यक्रम संपल्यानंतर केक खाण्यासाठी स्टेजवर मोठी गर्दी उसळली. प्रत्येकजण केक खाण्यासाठी धावत होता. त्यावेळी काही मुले स्टेजवरुन खालीही पडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि गर्दी कमी केली. त्यावेळी पोलिसांना लाठीमारही करावा लागला, अशी माहिती टीव्ही9 आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Maharashtra Winter Assembly Session 2020 च्या पूर्वसंध्येला भाजपा कडून चहापानावर बहिष्कार, राज्यात अघोषित आणीबाणी असल्याचं सांगत सरकारवर हल्लाबोल

शरद पवारांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. मुत्सद्दी राजकारणी, शेतीतज्ज्ञ, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. राजकीय जीवनात अनेक नेत्यांच्या वाट्याला येतात तसे चढउतार पवारांच्याही वाट्याला आले. मात्र कठीण प्रसंगातही त्यांचा संयम कधी ढळला नाही. आपल्या राजकीय कारकिर्दीत शरद पवार यांनी अनेक चमात्कार करुन दाखवले आहेत.