Sharad Pawar एनसीपी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर फेरविचार करण्यास 'सशर्त' तयार; कार्यकर्त्यांकडे मागितला 2-3 दिवसांचा वेळ - अजित पवार यांची घोषणा

आता कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन शरद पवार 2-3 दिवसांनी पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे.

NCP | Twitter

शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज वाय बी सेंटर मध्ये आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर नेते, कार्यकर्ते यांना भावना अनावर झाल्या आहे. सकाळी 11 च्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अनेक कार्यकर्ते मागील 6 तासांपासून अन्न-पाणी न घेता यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर उपोषणाला बसले आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नसल्याने अखेर आज रोहित पवार, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या बातचित करून आपल्याला पुन्हा विचार करण्यासाठी 2-3 दिवसांचा अवधी द्या अशी विनंती शरद पवार यांनी केली आहे. पण ही विनंती सशर्त  आहे.

शरद पवार यांनी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना अन्न-पाणी त्याग न करण्याची, आपल्या घरी परत जाण्याची विनंती केली आहे. सोबतच राजीनामा सत्र थांबवण्याच्या देखील सूचना केल्या आहेत. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना हे सांगताना कोणी कोठेही आंदोलन, उपोषण करताना दिसलं तर त्याचा मानसिक त्रास शरद पवार यांना होणार त्यामुळे हे असं करणं उचित नसल्याचं म्हटलं आहे. NCP New Chief निवडीसाठी Sharad Pawar यांनी नेमलेल्या समितीमध्ये कुणा-कुणची वर्णी? 

अजित पवार यांनी मीडीयाशी बोलताना शरद पवार यांना देशातूनही अनेक नेत्यांचे फोन येत असल्याचं म्हटलं आहे. पण आता कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन शरद पवार 2-3 दिवसांनी पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान कुणाचेही राजीनामे मान्य केले जाणार नसल्याचं देखील अजित पवार म्हणाले आहेत. वयाचं, आजारपणाचं  कारण देत शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून पायउतार करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यानंतर सांस्कृतिक क्षेत्र, शिक्षण, क्रिडा, शेती मध्ये काम करणार असल्याचं म्हटलं होतं.