IPL Auction 2025 Live

शेतीसाठी विशेष पॅकेज देऊन शेतक-यांच्या डोक्यावरील कर्ज कमी करा- शरद पवार

यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत असेही शरद पवारांनी सांगितले. आज घेतलेल्या फेसबुक लाईव्ह मध्ये ते बोलत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत असेही त्यांनी सांगितले आहे.

Sharad Pawar | (Photo Credits-Twitter)

Coronavirus च्या पार्श्वभूमीवर देशातील आर्थिक स्थिती गंभीर बनली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले आहे. अशा बिकट प्रसंगी पीककर्जाची परतफेड करणे सोपे नाही, म्हणून शेतीसाठी काही पॅकेजेस देण्याची गरज असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत असेही शरद पवारांनी सांगितले. आज घेतलेल्या फेसबुक लाईव्ह मध्ये ते बोलत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत असेही त्यांनी सांगितले आहे.

शरद पवारांनी घेतलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार, खासदार 1 महिन्याचे वेतन कोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. सरकार आणि RBIच्या निर्णयांचे स्वागतही त्यांनी यावेळी केले. कर्जावरील व्याजदर 5.14 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर आणण्यासह RBI ने केल्या 'या' महत्वपूर्ण घोषणा

शरद पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या सूचना

1. आंबा-द्राक्षांसाठी स्वतंत्र पॅकेज द्यावे

2. शेतक-यांच्या डोक्यावरील कर्ज कमी करा

3. गरजेपुरता कर्ज उपलब्ध करुन देणं

4. शेतीसाठी काही पॅकेजेस देण्याची गरज

हेदेखील वाचा- Coronavirus in Maharashtra: नागपूर, गोंदिया मध्ये कोरोनाचे 5 नवे रुग्ण; महाराष्ट्रात कोरोना व्हायरसग्रस्तांचा आकडा 135

यासोबत नागरिकांनी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा अन्यथा भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतीलस असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर या फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांनी नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या वर प्रश्नांवरही त्यांनी चर्चा केली.

लॉकडाऊनच्या काळात शिस्तीमुळे पोलिसांनी कडक निर्णय घ्यावे लागले. त्यामुळे नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. कामगारांचा विचार करुन कंपनी मालकांनी त्यांना आर्थिक मदत करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच देशातील सध्याच्या स्थितीमुळे अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता शरद पवारांनी यावेळी वर्तविली आहे.