Sharad Pawar Health Update: शरद पवार पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) गेल्या काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातून खडा काढण्यात आला होता.

Sharad Pawar | Photo Credits: Twitter/ Supriya Sule

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) गेल्या काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातून खडा काढण्यात आला होता. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांना (3 एप्रिल) रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांना पुन्हा एकदा ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या गॉल ब्लॅडरवर उद्या शस्त्रक्रिया केली जाणार आहे. याबाबत अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर आगामी दिवसात त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांचे गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. त्यासाठीच त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे देखील वाचा-Sanjay Raut on Lockdown: पश्चिम बंगालमधील निवडणूक रॅली संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाभरातील लॉकडाऊनबाबत निर्णय घेतील; संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर निशाणा

नवाब मलिक यांचे ट्वीट-

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांवरून शरद पवार हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. महत्वाचे म्हणजे, शरद पवार हे येत्या काही काळात पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये प्रचार दौरे करणार होते. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली. ज्यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द