Sharad Pawar on Kharghar Incident: गर्दी जमवून अनुकूल वातावरण करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा डाव होता, खारघरच्या घटनेची न्यायाधीशांमार्फत चौकशी करा - शरद पवारांची मागणी
सोबतच या घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
खारघर (Kharghar) मध्ये महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळा 16 एप्रिल दिवशी संपन्न झाला. या सोहळ्याला लाखोंची गर्दी जमली होती. दरम्यान 12 श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. विविध राजकीय पक्षांकडून त्यावर प्रतिक्रिया समोर येत असताना आज या दुर्घटनेबाबत बोलताना आज शरद पवार (Sharad Pawar) यांनी या दुर्घटनेत निष्पाप बळी गेले आहेत. त्यांच्या मृत्यूला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार आहे. दिवसा कडक उन्हात लोकांची गर्दी जमवून आपल्याला अनुकूल वातावरण करण्याचा डाव शिंदे-फडणवीस सरकारचा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सोबतच या घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
" खारघर मधील दुर्घटनेची चौकशी आता अधिकाऱ्याच्या समितीकडून करण्यात येत आहे. अधिकारी कितीही प्रामाणिक असला तरी तो राज्य सरकारच्या विरोधात अहवाल देणार नाही. त्यामुळे खारघर घटनेची सत्यता लोकांसमोर येणार नाही. सत्य बाहेर येण्यासाठी या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात यावी." असं शरद पवार म्हणाले आहेत. Heatstroke in Navi Mumbai: महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळ्यादरम्यान उष्मघाताच्या दुर्घटनेवर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी शोक व्यक्त करत घटनेचं राजकारण न करण्याचं केलं आवाहन.
पहा ट्वीट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, खारघर दुर्घटना बाबत एकसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. त्यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला आहे. दरम्यान लाईट्स अँड शेड्स इव्हेंट या कंपनीला सरकारने महाराष्ट्र भूषण सोहळ्याचे काम दिले होते. आता विरोधकांनी सदोष मनुष्यवधाच्या आरोपासह कंपनीचे मुख्यमंत्र्यांशी लागेबांधे आहेत का? याची विचारणा केली आहे.