IPL Auction 2025 Live

Baramati Vidhan Sabha: शरद पवार यांनी केली अजित पवार यांची नक्कल; सभेत पिकला हशा, जोरदार घोषणाबाजी

त्यांनी अजित पवार यांची खास नक्कल केली.

Sharad Pawar, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Assembly Election 2024: शरद पवार () म्हणजे प्रचंड उर्जा, सातत्य आणि राजकीय निष्णात व्यक्तीमत्व म्हणून अवघ्या देशाला परिचीत. एखाद दुसरा अपवाद वगळता आजवर त्यांनी आपल्या भाषणात कधीही भाषा आणि वर्तनाचा तोल ढळू दिला नाही. असे असताना बारामती येथे मात्र त्यांनी थेट उपमुख्यमत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नक्कल केली. ज्याला उपस्थितांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. इतकेच नव्हे तर त्यांनी केलेल्या या हटके मिमीक्रीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.

काका आणि पुतण्यात थेट संघर्ष

बारामती विधानसभा मतदारसंघ प्रचंड उत्सुकतेचा आणि तितकाच राजकीय वर्तुळात उत्कंटा वाढवणारा ठरला आहे. या ठिकाणी या ठिकाणी विधानसभा निवडणूक 2024 साठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे युगेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाकडून मैदानात आहेत. वरवर पाहता ही लढाई दोन उमेदवारातील असल्याचे दिसत असले तरी, ती थेट शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे. त्यामुळे बारामती येथील जनता आपल्या कौल कोणाच्या बाजूने देते याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Suraj Chavan Supports Ajit Pawar: 'अजित दादांना झापूक झुपूक मतदान करा'; Bigg Boss Marathi 5 विजेता सूरज चव्हाण चं बारामती मध्ये जाहीर सभेत आवाहन (Watch Video))

अजित पवार यांना अश्रू अनावर

शरद पवार यांनी केलेल्या मिमिक्रीला पार्श्वभूमी होती अजीत पवार यांना बारामती येथे भाषण करताना अनावर झालेल्या आश्रुंची. बारामती येथून उमेदवारी अर्ज दाखल करताना अजित पवार भाऊक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी भाषण थांबवून दोन वेळा पाणी प्यायले. या वेळी त्यांनी शरद पवार आणि कुटुंबातील स्थितीशी संबंधीत काही विधानेही केली. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी शरद पवार बारामतीला पोहोचले आणि त्यांनी पुतण्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला. (हेही वाचा, Baramati Assembly Constituency: बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार, युगेंद्र पवार यांच्याकडून अर्ज दाखल)

कालचं भाषण बघितलं का? उपस्थिकांकडून जोरदार प्रतिसाद

शरद पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट

शरद पवार यांनी म्हटले की, आजकाल लोक काहीही बोलाय लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत म्हणाले, साहेब येतील.. तुम्हाला भावनिक करतील.. पण तुम्ही लक्ष देऊ नका. आपण विकासासाठी वेगळा निर्णय घेतला आहे. पण, कालचं भाषण बघीतलं का.. (अजित पवार यांची नक्कल). शरद पवार यांना उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यानंतर शरद पवार म्हणाले, प्रश्न केवळ भावनेचा नाही. तो तत्त्व आणि विचारांचा आहे. आम्ही गांधी, नेहरु आणि यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेतले आहेत. कामही तसेच करतो. यशवंतराव चव्हाण, ज्योतीराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे या हिच माझी विचारधारा आहे. त्यामुळे त्या विचारधारेपलीकडे आम्ही जाणार नाही, हीच आमच्या कामाची पद्धत असल्याचे शरद पवार म्हणाले.